ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार विनायक वैद्य यांना पुत्रशोक. धाडसी युवानेतृत्व वैभव वैद्य यांचे दुःखद निधन.

पाठलाग न्यूज / प्रतिनिधी:

ज्येष्ठ पत्रकार विनायक वैद्य यांना पुत्रशोक. धाडसी युवानेतृत्व वैभव वैद्य यांचे दुःखद निधन.

बीड/ प्रतिनिधी:द्वारकाधीश मित्र मंडळाचे विश्वस्त एक धाडसी युवा नेतृत्व म्हणून सर्वत्र परिचित असलेले वैभव विनायक वैद्य यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथील ज्यूपिटर हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असताना रविवार दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी पहाटे 4:30 वाजता दुःखद निधन झाले. मृत्यू समयी ते अवघ्या 37 वर्षाचे होते.त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 5 वाजता बीड येथील अमरधाम स्मशानभूमी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बीड शहरातील धोंडीपुरा जव्हेरीगल्ली भागात राहणारे वैभव विनायक वैद्य हे बीड जिल्हा मराठी पत्रकार संघ बीडचे सचिव व बीड शहरातील जेष्ठ संपादक पत्रकार विनायक वैद्य यांचे चिरंजीव होते. वैभव वैद्य हे द्वारकाधीश मित्र मंडळामार्फत व परशुराम गुरखुदे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून युवकात प्रसिद्ध होते. कोणत्याही गरजवंतांच्या कामाला धाडसाने धावून जाणारे नेतृत्व म्हणून वैभव वैद्य यांची वेगळी ओळख होती. सर्व जाती धर्मातील सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये त्यांचा सक्रिय उत्स्फूर्त सहभाग असायचा. छत्रपती शिवाजी महाराज जयंती, स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती, गणेश उत्सव, राम जन्म उत्सव व इतर अनेक धार्मिक कार्यात ते विविध उपक्रमांच्या माध्यमातून उस्फूर्तपणे सहभाग घेत असत. युवकांचे मोठे नेटवर्क संघटित करून द्वारकाधीश मित्र मंडळाच्या माध्यमातून त्यांनी परशुराम गुरखुदे यांच्या पाठीशी मोठी ताकद उभा केली होती. युवक वर्गात त्यांची एक वेगळी छबी आणि दरारा होता.मागील आठवड्यामध्ये वैभव वैद्य यांना अचानक अस्वस्थ्य वाटू लागल्याने बीडच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती जास्त खालवल्याने त्यांना ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती जास्तच बिघडल्याने प्राणज्योत मावळली. त्यांच्या दुःखद निधनाच्या वृत्तावर विश्वासच बसत नाही. एक हरहुन्नरी, हजरजबाबी, निर्णय घेण्याची तात्काळ क्षमता असलेला धाडसी युवा नेता अशा पद्धतीने अचानक जाईल असे स्वप्नातही वाटत नाही. वैभव वैद्य यांच्या अचानक निधनाने द्वारकाधीश मित्रपरिवार मात्र पोरका झाला आहे. त्यांच्या पश्चात वडील पत्रकार विनायक वैद्य, आई, पत्नी, एक मुलगा, चार बहिणी, मेव्हणे, द्वारकाधीश असा मोठा परिवार आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वैद्य कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात दैनिक पाठलाग न्युज परिवार सहभागी आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये