ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
केज विधानसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार नमिता ताई मुंदडा यांच्या प्रचारार्थ भाजपाच्या माजी खासदार प्रीतमताई गोपीनाथ मुंडे यांचा ग्रामीण भागात दौरा संपन्न.
पाठलाग न्यूज / प्रतिनिधी :



दरम्यान, ग्रामीण भागातील मतदारांनी भाजपाच्या उमेदवाराला प्रचंड प्रतिसाद देत कैलासवासी गोपीनाथ मुंडे साहेबांचे स्मरण देत आम्ही भाजपालाच मतदान करणार असा विश्वास दिला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने मा. खासदार डॉ. प्रितमताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब व उमेदवार नमिता ताई मुंदडा यांच्या समवेत अनेक कार्यकर्त्यांसह आज सकाळी बनकारंजा, तांबवा, जिवाचीवाडी, येवता, शिंदी,विडा, कोरडेवाडी व दहीफळ या गावांना भेटी दिल्या. भेटीदरम्या प्रत्येक गावातील तमाम मतदार बंधू-भगिनींशी विविध विषयांवर संवाद साधला.
मा.प्रितमताईंनी आपल्या प्रेरणादायक भाषणातून ग्रामस्थांना मी स्वतःच उमेदवार असून, माझ्या रूपाने नमिता ताई मुंदडा यांना आशीर्वाद देण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले. प्रीतम ताई मुंडे यांच्या विश्वासाने आणि सहकार्याने गावातील प्रत्येक व्यक्तीला एक नवा उत्साह मिळाला. या प्रसंगी तमाम ग्रामस्थ, आजी-माजी सरपंच, ग्रा. सदस्य, सोसायटी चेअरमन, भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.