ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

केज मतदार संघात मतदारांना तोंड दाबून बुक्क्याचा मार. केज- अंबाजोगाई मतदारसंघात अखेर “मुंदडापर्वाची” पुनरावृत्ती.

केज मतदार संघात मतदारांना तोंड दाबून बुक्क्याचा मार.

केज- अंबाजोगाई मतदारसंघात अखेर “मुंदडापर्वाची” पुनरावृत्ती?

केज-अंबाजोगाई मतदारसंघाच्या विद्यमान आमदार नमिताताई मुंदडा..

केज : केज अंबाजोगाई मतदार संघात समोरचे विरोधी उमेदवार दुर्बल व असक्षम पडल्याने प्रचंड विरोध आणि नाराजी असताना देखील भाजपाच्या स्टँडिंग आमदार नमिता मुंदडांना मतदान करून पुन्हा मुंदडा पूर्व अबाधित ठेवण्याची पाळी केज अंबाजोगाई मतदारसंघातील बहुसंख्य भाजपा समर्थक कार्यकर्ते व मतदारावर आल्याने पुन्हा एकदा नमिता मंडळाचे नशीब उघडण्याची वेळ आल्याचे सर्वत्र चित्र आहे. केज विधानसभा मतदार संघात राजकीय झपाट्याने राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मागील अनेक दिवसांपासून मुंदडा परिवाराच्या कारकिर्दीत सासुरवास भोगावा लागला असला तरी, आता नाईलाज म्हणून नमिता मुंदडा यांनाच भाजपाचे तत्त्व व निष्ठा म्हणून पुन्हा संधी दयावी लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. भाजपाच्या गोटात अशीच चर्चा चालू आहे. काही बोलायच नाही किंवा चर्चा करायची नाही, गुपचूप जायचं आणि मारून मुटकून आपलं मतदान करायच आणि घरी निघून यायचं ‘ अशी चर्चा संपूर्ण मतदारसंघात चालू झाली आहे. समोर अपक्ष तगडा उमेदवार नसल्यामुळे आज पर्यंत भाजप सोडून कधीच मतदान न केलेल्या कार्यकर्त्यांना मनात इच्छा नसताना देखील मुंदडांनाच मतदान करावं लागणार आहे अशी अनेकजन चर्चा करताना दिसत आहेत. आज मुंदडा कडून काहीही आश्वासन मिळाले तरी मतदान संपलं आणि विजय मिळाला कीं पुन्हा पहिल्या सारखेच होणार आहे हे निश्चित. आता आपलं काम गपचूप जायच आणि भाजपाला मतदान करायच आणि घरी जाऊन बसायचं एवढच आपल्या हातात राहिलं आहे. पंकजाताई आल्या तरी आपुन काही म्हणायच नाही, आजपर्यंत भाजपला मतदान केलय आताही जायच मतदान करायच अन घरी जाऊन बसायचं अशी चर्चा मतदार संघात चालू झाली आहे. कोणाला काही म्हणायच नाही आणि आपणही काहीच करायच नाही असंच भाजपचे कार्यकर्ते बोलत असून,अनेकांनी राजकारण सोडून आपले काम भले आणि आपण भले अशी भूमिका घेऊन चालायचं असे बहुसंख्य मतदार कार्यकर्ते चर्चा करताना दिसत आहेत. सगळ्यांना आपलं राजकीय भविष्य संपलं अशी भावना मतदार संघात झाली आहे. कारण आज कोणी कितीही काहीही म्हणलं तरी पुन्हा तेच होणार आहे. असा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळे आधीच अनेकांचे खूप नुकसान झाले आहे. अजून व्हयला नको म्हणून आपलं गप बसलेले बर. कारण पंकजाताई काही आपलं ऐकत नाहीत त्यामुळे आहे ते स्वीकारण्या शिवाय कोणाकडेच पर्याय उरलेला नाही. त्यासाठी आपणच आपलं दुकान बंद केलेलं बर,असं अनेकांचं मत बनल्याची चर्चा आहे. त्यामुळे नाराजी आहे पन पर्याय नाही अशी गत अनेकांची झाली आहे. या विचार लहरीचा प्रभाव म्हणून केज अंबाजोगाई मतदार संघात पुन्हा मुंदडा परिवाराचा प्रभाव दिसून येणार हे निश्चित मानले जाऊ लागले आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये