केजवर पुन्हा शोककळा…!. केजच्या शैक्षणिक क्षेत्रातील एक मोहरा हरवला…! स्वामी विवेकानंद विद्यामंदिर चे सेवानिवृत्त मुख्याध्यापक बी व्ही गोपाळघरे कालवश….!
केजवर पुन्हा शोककळा…!. केजच्या शैक्षणिक क्षेत्रातील एक मोहरा हरवला…!स्वामी विवेकानंद विद्यामंदिर चे सेवानिवृत्त मुख्याध्यापक बी व्ही गोपाळघरे कालवश….!
केज: केज न.प.च्या नगरसेविका सौ.शिंदे यांचे चिरंजीव सुमेध शिंदे यांचे र्हदयविकाराच्या झटक्याने निधन आणि बीड जि.प.चे मा.अध्यक्ष देवेंद्र शेट्ये यांचे बंधू किशोर अप्पा शेट्ये यांचे अपघातात निधन,या दोन्ही एकाच दिवशी घडलेल्या दुखद घटणानी केज शहराला झाकाळलेले असतांनाच केज शहरातील नामांकित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर या शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोपाळघरे सरांच्या आज पहाटे अचानक निधनाच्या बातमीने पुन्हा केज शहराच्या दुखात भर पडली आहे. स्वामी विवेकानंद विद्यामंदिर चे सेवानिवृत्त मुख्याध्यापक बी व्ही गोपाळघरे सरांनी केज शहरातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेच्या पायाभरणीत महत्वाचे योगदान दिलेले आहे…! ते या शाळेचे संस्थापक शिक्षक-मुख्याध्यापक होते. ज्या शिक्षकांनी शाळेच्या उभारणीत मोठे योगदान दिले त्यात गोपाळघरे सरांचे नांव अग्रभागी होते…! गेली तीन दशके त्यांनी या शाळेत अध्यापन केले. एवढ्या मोठया शाळेचे व्यवस्थापन त्यांनी समर्थपणे पेलले. दोन वर्षांपूर्वीच ते या शाळेच्या मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाले होते. सध्या त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांना काल प्रकृती ठीक नसल्याने आंबेजोगाईच्या रुग्णालयात दाखल केले होते. आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. ते 63 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्यावर आज सायंकाळी 5 वाजता त्यांच्या होळ (ता. केज) या जन्मगावी शेतात अंत्यसंस्कार पार पडत आहेत. बी व्ही गोपाळघरे सरांना केजच्या शिक्षण क्षेत्र, सर्व विद्यार्थी-पालक व केजवासीयांसह पाठलाग न्युज परिवाराची भावपूर्ण श्रद्धांजली!!
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.