ताज्या घडामोडीमहाराष्ट्रसन्मान कर्तव्याचा

नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता बॅक खात्यात जमा झाल्या बद्दल व ई-पीक पाहणीची अट रद्द केल्याबद्दल शेतकऱ्यांनी कृषीप्रदर्शण उदघाटन कार्यक्रमातंच पाठवले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार मानणारे मेसेज!

पाठलाग न्युज/ वृत्तसंस्था:

नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता बॅक खात्यात जमा झाल्या बद्दल व ई-पीक पाहणीची अट रद्द केल्याबद्दल शेतकऱ्यांनी कृषीप्रदर्शण उदघाटन कार्यक्रमातंच पाठवले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार मानणारे मेसेज!

परळी वैद्यनाथ : परळी वैजनाथ येथे बुधवारी दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन संपन्न झालेल्या कृषी महोत्सवात नमो शेतकरी महासंन्मान योजनेचा प्रत्येकी दोन हजार रुपयांचा हप्ता एका क्लिकवर 91 लाख शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला. यावेळी राज्य सरकार जितके अलर्ट आहे तितकेच अलर्ट शेतकरी सुद्धा असल्याची अनुभूती आली आहे.झाले असे की, कृषी महोत्सवाच्या उद्घाटनाच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या चौथ्या हप्त्याचे ऑनलाईन वितरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पैसे मिळाले का? असे विचारताच सभागृहात बसलेल्या हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे मेसेजेस त्यांच्या मोबाईलवर आले.

त्याचबरोबर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या विनंतीवरून सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी ई-पीक पाहणीची घातलेली अट मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात रद्द करत असल्याचे जाहीर केले. याचा दुहेरी आनंद झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच कृषी मंत्री यांचे आभार मानणारे मेसेजेस धनंजय मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकांकडे पाठवले.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये