ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

केजमध्ये भाजपकडून आ. नमिताताई मुंदडा तर राष्ट्रवादी (शरद पवार गट ) कडून साठे यांच्यातच होणार लढत. —————————————- माजी आ.पृथ्वीराज साठेंना त्यांच्या निष्ठेची पावती उमेदवारीतून मिळणार ?

पाठलाग न्युज/परमेश्वर गित्ते:

केजमध्ये भाजपकडून आ. नमिताताई मुंदडा तर राष्ट्रवादी (शरद पवार गट ) कडून साठे यांच्यातच होणार लढत.

केज-अंबाजोगाई मतदारसंघाच्या विद्यमान आमदार नमिताताई मुंदडा.

 माजी आ.पृथ्वीराज साठेंना त्यांच्या निष्ठेची पावती उमेदवारीतून मिळणार ?

———————————— केज: केज विधानसभा मतदारसंघातील लढती जवळपास निश्चित झाल्या आहेत. केज विधानसभा मतदारसंघ आरक्षित असल्याने या ठिकाणी भाजपाकडून विद्यमान आ. नमिताताई मुंदडा यांनाच उमेदवारी निश्चित मानली जात आहे तर राष्ट्रवादी (खा.शरदचंद्र पवार गट)कडून माजी आ. पृथ्वीराज साठे यांनाच उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती पुढे येत आहे.कारण माजी आ. पृथ्वीराज साठे यांनी सत्तेचा डामडौल बाजूला सारत खा. शरदचंद्र पवार यांच्यासोबत विरोधी पक्षात बसणे पसंत करून अंगाला राख लावून घेतलेली आहे. त्यामुळे निष्ठावंतालाच उमेदवारी मिळेल हे आता स्पष्ट होत आहे. केज विधानसभा मतदारसंघ यावेळी लक्षवेधी मतदारसंघ असणार आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने या ठिकाणी या अगोदर स्पर्धा नव्हती. महत्त्वाच्या प्रतिस्पर्धी पक्षाच्या उमेदवारातच लढत होत होती हे आजवर दिसलेले आहे. यावेळी मात्र आरक्षित जागेची शेवटची निवडणूक असल्याने मोठ्या प्रमाणात स्पर्धा या ठिकाणी दिसते आहे. भाजपकडून विद्यमान आ.नमिताताई मुंदडा यांनाच उमेदवारी दिली जाणार असल्याने त्या ठिकाणी इतर कोणी इच्छुक नाही कोणी मागणी केलेली नाही. केवळ बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी केज विधानसभेवर महायुतीकडून दावा केला आहे.मात्र ही जागा अजित पवारांच्या गटाला सुटणार नाही हेही तेवढेच खरे आहे. पोटभरे त्यांच्याशिवाय इतरांनी कोणी मागणी केलेली नाही. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गटा) कडे मोठ्या प्रमाणात उमेदवारीसाठी गर्दी दिसते आहे. माजी आ. प्रा.सौ.संगीताताई ठोंबरे,डॉ. सौ. अंजलीताई घाडगे,उद्योजिका सौ.मनीषाताई गोकुळ जाधव, इंजि. एन. डी. शिंदे,महाविकास आघाडीकडून ऍड.शिवाजी कांबळे, सौ.संगीताताई तूपसागर, रमेश (तात्या )गालफाडे, रणधीर कांबळे यांची नावे पुढे येत आहेत. मात्र खा. शरदचंद्र पवार हे उमेदवारी देताना कुठली कसोटी लावणार आहेत याकडे लक्ष असणार आहे. निष्ठावंताची लावणार की, आर्थिक क्षमतेची लावणार की, आज प्रवेश उद्या उमेदवारी ही लावणार याकडे जिल्ह्याचे लक्ष असणार आहे. प्रत्येक निवडणुकीत जिंकणे हेच सूत्र असते. त्यासाठी पक्षप्रवेश करून घेत असतात केजमध्ये असे होणार नाही असे शरद पवारांच्या जुन्या सहकाऱ्यांचे मत आहे. निष्ठावंतांना संधी दिली जाईल असे अनेकांना वाटते. माजी आ. पृथ्वीराज साठे यांनी पक्षफुटी नंतर आ. संदीप क्षीरसागर यांच्यासोबत पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांचा स्नेह तोडून खा.शरदचंद्र पवार यांच्यासोबत राहत अजितदादाच्या विरोधात राहणे पसंत केले. त्यावेळी व त्या काळात ही कृती म्हणजे अंगाला राख लावून घेण्यासारखीच होती. पण ते धैर्य माजी आ. साठे यांनी दाखवले त्यामुळे माजी आ. साठे यांना कामाला लागण्याच्या सूचना प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी परवा झालेल्या निष्ठावंतांच्या मेळाव्यात दिल्या असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. केज विधानसभा मतदारसंघात पुन्हा विद्यमान आ.नमिताताई मुंदडा विरुद्ध माजी आ. पृथ्वीराज साठे यांच्यातच लढत होईल असे सांगितले जात आहे व तशी स्थिती आहे.यावेळची निवडणूक खूप वेगळी आहे आत्ताची निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. त्यामुळे चुरशीची होणार यात शंका नाही.तसेच अपक्ष, बंडखोर आणि इच्छुकांची संख्या यामुळे याला अधिक महत्त्व येणार आहे. मतविभागणीचा फटका आणि फायदा कोणाला होईल हे आज सांगता येत नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) कडून माजी आ.पृथ्वीराज साठे यांची दावेदारी व उमेदवारी प्रबळ मानली जात आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात आणखी काय?काय? घडामोडी होतात आणि काय? काय? बातम्या समोर येतात याकडे जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये