ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

माजलगाव मतदार संघातून डॉ. अशोक थोरात शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्याच्या तयारीत! डॉ. अशोक थोरातांकडून कडून माजलगावची जोरदार तयारी सुरू.

पाठलाग न्युज/परमेश्वर गित्ते:

माजलगाव मतदार संघातून डॉ. अशोक थोरात शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्याच्या तयारीत!

डॉ. अशोक थोरातांकडून कडून माजलगावची जोरदार तयारी सुरू.

माजलगाव: महाविकास आघाडीची उमेदवारी घेणार का? असा सवाल लोकसभा निवडणुकीआधी कोणाला विचारला की? नको रे बाबा? बुडत्या जहाजात कोणी बसावं? असा सवाल केला जायचा. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील वातावरण व राजकीय परिस्थिती बदलली आहे. आता महाविकास आघाडीकडे उमेदवारीसाठी रांगा लागल्या आहेत. बीड जिल्ह्यातून सहा विधानसभा मतदारसंघातील मातब्बर नेते खा. शरदचंद्र पवारांच्या संपर्कात आहेत. तेच मातब्बर नेते उद्याचे उमेदवार असणार आहेत. दलबदलूंना खा.शरदचंद्र पवार संधी देणार नाहीत. हे आता स्पष्ट झाले आहे. माजलगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात हे माजलगाव मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत.तशी जोरदार तयारी डॉ. अशोक थोरात यांनी सुरू केली आहे. डॉ. अशोक थोरात यांच्या उमेदवारीने आ. प्रकाश सोळंके डॉक्टर अशोक थोरात यांच्या उमेदवारीने आ. सोळंकेना ही निवडणूक जड जाणार आहे. डॉ.अशोक थोरात म्हणजे नवी कोरी पाटी आहे. बीड जिल्ह्याच्या राजकारणात व समाजकारणात त्यांचं नाव मोठं आहे.त्यांनी राजकारण केलं नसलं तरी अनेकांना त्यांनी राजकारणात आणल आहे व स्थायिक केले आहे. राजकारणाचा प्रचंड व्यासंग आणि अभ्यास असलेले डॉ. अशोक थोरात हे माजलगाव मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याने अनेकांना धक्का आणि धोका बसणार आहे. खा. शरदचंद्र पवारांकडून माजलगाव मधून लढण्यास अनेक जण इच्छुक होते. त्यांच्या स्वप्नावर पाणी पडले आहे. डॉ.अशोक थोरात यांनी बीड जिल्ह्यात जवळपास गेल्या 25 वर्षापेक्षा अधिक काळापासून वैद्यकीय सेवा आणि नोकरी केली आहे.तसेच स्व. आ. डॉ. सौ.विमलताई मुंदडा या मंत्री असताना त्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून सुद्धा काम केले आहे. त्या काळात असेल किंवा नोकरीच्या काळात असेल त्यांनी अनेकांना मदत व सहकार्य केलेले आहे. अनेक तरुणांना आरोग्य खातात असेल किंवा इतर खात्यात असेल त्यांनी नोकरी लावण्याचे काम केले आहे. नोकरीच्या काळात प्रत्येकाला मदतीचा हात देण्याचा त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे. सृजनशील असलेले डॉ. अशोक थोरात हे उद्याच्या काळात सकारात्मक राजकारणातील ध्रुवतारा बनतील असे गट्स त्यांच्यात व त्यांच्या नेतृत्वात आहेत.बीड लोकसभा निवडणुकीतच त्यांना खा.शरदचंद्र पवार यांनी डॉ. अशोक थोरात यांना बीड लोकसभा निवडणूक लढवावी अशी अट घातली होती. मात्र डॉक्टर अशोक थोरात यांनी लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांनी केलेल्या सहकार्याची व मदतीची जाणीव ठेवून पंकजाताईंच्या निवडणुकीत मुंडे घराण्यासोबत कृतघ्नपणा करणार नाही अशी भूमिका घेतली. आता डॉ. अशोक थोरात यांनी शासकीय वैद्यकीय सेवेचा राजीनामा देऊन नाशिक विभागातील आरोग्य संचालक पदावरून स्वेच्छा निवृत्ती स्वीकारून सक्रिय राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आणि त्यानुसार तयारी सुरू केली आहे.डॉ.अशोक थोरात यांना बीड जिल्ह्यातील सर्व राजकारण्याची पाळेमुळे ज्ञात आहेत.कोणाला कशी टक्कर द्यायची याचा पूर्ण अभ्यास आहे. याच मातृभूमीतील असल्याने प्रत्येकाचा आवाका आणि व्याप्ती याची जाणीव त्यांना आहे. राजकारण केले नसले तरी त्यांच्या राजकीय टिप्समुळे अनेकांचे कल्याण झाले आहे. खासदार शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली माजलगाव विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने निवडणूक लढवण्याचे निश्चित केले आहे. डॉ.अशोक थोरात यांच्या उमेदवारीने माजलगाव मतदार संघातील इच्छुकांची गोची झाली आहे. जे बांधावर होते ते अडचणीत सापडले आहेत. डॉ.अशोक थोरात यांची ‘ ब्राईट ‘ प्रतिमा हीच त्यांच्या विजयाची नांदी ठरणार आहे.उद्याच्या राजकारणातील स्वच्छ प्रतिमेचा आणि सकारात्मक राजकारणाचा ‘ मानबिंदू ‘ ठरतील यात कोणाचेही दुमत नाही. माजलगाव विधानसभा मतदारसंघाच्या परिघात डॉ. अशोक थोरात ब्रँड नक्कीच चालेल असा विश्वास मतदार संघातील नागरिकांना व मतदारांना वाटतो आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये