ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

बीड लोकसभा “महायुती”च्या उमेदवार लोकनेत्या पंकजाताई गोपिनाथ मुंडे यांच्या प्रचारार्थ मा.मंत्री सयाजीराव बनसोडे व मा.गोविंद आण्णा केंद्रे यांच्या विडा सर्कलमध्ये काॅर्नर बैठका.

पाठलाग न्युज/प्रतिनिधि:

बीड लोकसभा “महायुती”च्या उमेदवार लोकनेत्या पंकजाताई गोपिनाथ मुंडे यांच्या प्रचारार्थ मा.मंत्री सयाजीराव बनसोडे व मा.गोविंद आण्णा केंद्रे यांच्या विडा सर्कलमध्ये काॅर्नर बैठका.

केज: बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ माजी युवक कल्याण मंत्री सयाजीराव बनसोडे व अहमदपुरचे मा.आमदार गोविंद आण्णा केंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत केज तालुक्यातील विडा सर्कलमधील अनेक गावांत काॅर्नर बैठका संपन्न झाल्या असून, उभयतांनी पंकजाताई ताई सारख्या अनुभवी नेतृत्वालाचं मतदान करुन स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंचे स्वप्न पुर्ण करण्याचे आवाहन केले.

महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक क्रिडा युवक कल्याण मंत्री, *संजयजीराव बनसोडे* साहेब व *गोविंद आण्णा केंद्रे* (माजी आमदार व भारतीय जनता पार्टी उप-अध्यक्ष) यांनी कानडी, लव्हरी, व येवता या ठिकाणी कॉर्नर बैठका घेऊन ग्रामस्थांशी चर्चा केली, या बैठकीत संजयजी बनसोडे साहेब व गोविंद आण्णा यांनी समाज बांधवांना योग्य ते मार्गदर्शन करुन बीड लोकसभेच्या उमेदवार लोकनेत्या *पंकजाताई गोपिनाथ मुंडे* यांनाच प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन केले. या वेळी उपस्थित लातुर जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, *राहुल केंद्रे*,जि, प, सदस्य लातुर चे *सुदर्शन मुंडे,* भाजपा चे जेष्ठ नेते रमाकांत बापु मुंडे, विडा सर्कल चे माजी जि,प सदस्य विजयकांत मुंडे, केज भाजपा चे नेते दत्ता धस, भाजपा चे नेते दिनकर चाटे राष्ट्रवादी चे केज तालुका अध्यक्ष, विष्णू चाटे, वैद्यकीय आघाडी चे डॉ,वसुदेव नेहरकर,सारंग आंधळे, भाजपाचे नेते शेशेराव कसबे,सासुरा गावचे *बिबिशण पाळवदे* कानडी चे सरपंच अशोक राऊत, कानडी चे उप सरपंच बालासाहेब राऊत येवता ग्रामपंचायत सदस्य वसंत सोनवणे,सोशल मीडिया संयोजक केज तालुका ईश्वर बिक्कड उपस्थित होते.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये