नांदेड जिल्हा शिवसेनेच्या अत्यंत महत्वपूर्ण आढावा बैठकीचे आयोजन.सर्व पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे अवाहन.
नांदेड: शिवसेनेचे प्रमुख नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्हा शिवसेना व शिवसेनेच्या सर्व अंगिकृत संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीचे रविवार दि.१०/१२/२०२३ रोजी आयोजन करण्यात आले असून,नांदेड येथिल अथिती हाॅटेल येथे होणाऱ्या महत्वपूर्ण बैठकीस सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थितीत राहण्याचे आवाहन नांदेड जिल्हा शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केले आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की,नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेमध्ये काही संघटनात्मक बदल झाल्यानंतर नांदेड जिल्हा शिवसेनेची पहिलीच महत्वपूर्ण बैठक रविवार दि.10/12/2023 रोजी हॉटेल अतिथी, शिवाजीनगर पोलीस स्टेशन बाजूस सकाळी 11.00 वाजता जिल्ह्यातील सर्व शिवसेना-युवासेना, महिला आघाडी व अधिकृत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. सदरची बैठक विधानसभा परिक्षेत्राअनुसार घेण्यात येणार असून,ही बैठक 1-दुसरी 12.00 वा.किनवट-माहूर विधानसभा प्रमुख पदाधिकारी 2- दुसरी 12.30 वा.हदगाव-हिमायतनगर विधानसभा प्रमुख पदाधिकारी 3- दुसरी 1.00 वा. देगलूर-बिलोली विधानसभा प्रमुख पदाधिकारी 4- दुसरी 1.30 वा. मुखेड विधानसभा प्रमुख पदाधिकारी 5- दुसरी 2.00 वा. लोहा-कंधार विधानसभा प्रमुख पदाधिकारी 6- दुसरी 2.30 वा. नायगाव विधानसभा प्रमुख पदाधिकारी 7- दुसरी 3.00 वा. भोकर विधानसभा प्रमुख पदाधिकारी 8- दुपारी 3.30 वा. नांदेड दक्षिण विधानसभा प्रमुख पदाधिकारी 9- दुसरी 4.00 वा. नांदेड उत्तर विधानसभा प्रमुख पदाधिकारी . बैठकीचा कार्यक्रम वरील प्रमाणे निश्चित केलेला असून, या बैठकीला नवनिर्वाचित शिवसेना विभागीय संपर्कनेते तथा लोकसभा संपर्कप्रमुख मा.श्री.आनंदराव जाधव साहेब, शिवसेना उपनेते तथा खासदार मा.श्री.हेमंतभाऊ पाटील,नांदेड लोकसभा निरीक्षक श्री.दिलीपजी शिंदे,जिल्हा संपर्कप्रमुख दक्षिण श्री.सिद्धेश दुधवडकर,जिल्हा संपर्कप्रमुख उत्तर श्री.संतोष माने,जिल्हा संपर्कप्रमुख ग्रामीण श्री.संजय काळे,नांदेड उत्तरचे लोकप्रिय आमदार श्री.बालाजीराव कल्याणकर तसेच पुनर्नियुक्ती झालेल्या शिवसेना महिला जिल्हा संपर्कप्रमुख सौ.रत्नमालाताई मुंडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी शिवसेना नांदेड जिल्ह्यातील सहसंपर्कप्रमुख, जिल्हासंघटक ,सर्व उपजिल्हाप्रमुख,तालुकाप्रमुख, महानगरप्रमुख,शहरप्रमुख,उपशहरप्रमुख, उपतालुकाप्रमुख,नगरसेवक,सर्कलप्रमुख व युवासेना पदाधिकारी,महिला आघाडी पदाधिकारी व इतर सर्व अंगीकृत संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या महत्त्वपूर्ण बैठकीस उपस्थित रहाण्याचे अवाहन आनंदराव पाटील बोंढारकर (शिवसेना जिल्हाप्रमुख नांदेड)उमेश मुंडे(शिवसेना जिल्हाप्रमुख नांदेड), बाबुराव कदम कोहळीकर,(शिवसेना जिल्हाप्रमुख नांदेड), गणेश पाटील शिंदे, (युवासेना जिल्हाप्रमुख नांदेड), संदेश पाटील हडसनीकर,(युवासेना जिल्हाप्रमुख नांदेड) सौ.गिताताई पुरोहित,(महिला आघाडी जिल्हाप्रमुख नांदेड),सौ.शितल भांगे पाटील,(महिला आघाडी जिल्हाप्रमुख नांदेड) यांनी केले आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.