ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
*शिवसेनेचे प्रमुख नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्या “शासन आपल्या दारी” निमित्त रविवारी नांदेड दौरा निमित्त. नांदेड जिल्हा शिवसेनेची बैठक संपन्न.नांदेड जिल्हा महिला आघाडीचे पदाधिकारी जाहीर.
पाठलाग न्युज/नांदेड:


या बैठकीला शिवसेना उपनेते तथा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव साहेब व शिवसेना उपनेते तथा खासदार हेमंतभाऊ पाटील यांचे प्रतिनिधी, आमदार बालाजीराव कल्याणकर, शिवसेना महिला जिल्हा संपर्कप्रमुख सौ.रत्नमालाताई मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर बैठकीचे आयोजन नांदेड चे जिल्हाप्रमुख आनंदजी बोंडारकर व उमेशजी मुंडे यानी केले होते.
सदर बैठकी साठी नांदेड जिल्ह्यातील सहसंपर्कप्रमुख, जिल्हासंघटक ,सर्व उपजिल्हाप्रमुख,तालुकाप्रमुख, महानगरप्रमुख,शहरप्रमुख,उपशहरप्रमुख,जि.प.सदस्य,प.स.सदस्य,नगरसेवक, सरपंच,ग्रामपंचायत सदस्य,सर्कलप्रमुख,उपसर्कल प्रमुख, शाखाप्रमुख, बुथप्रमुख,युवासेना, महिला आघाडी चे पदाधिकारी व इतर सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रस्तुत बैठकीत नांदेड जिल्हा महिला आघाडी च्या जाहीर पदाधिकारी यांची नियुक्तीपत्रं उपनेते तथा नांदेड-हिंगोली चे संपर्कप्रमुख मा आनंदजी जाधव व नांदेड-हिंगोली च्या महिला संपर्कप्रमुख सौ. रत्नमालाताई मुंडे यांचे हस्ते वितरित करण्यात आले. जिल्हाप्रमुख म्हणून सौ.गिताताई पुरोहित, सो.शितलताई भांगे,सौ.गीतांजली पवार यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.



