ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रसंत भगवान बाबांचे व समाजाचे नाव पुढे करुन केज येथील शिक्षक कॉलनी नजिक प्रसाद गृहनिर्माण संस्थेच्या खुल्या भुखंडावर बावळट व छीछुर्या दलालांचा डल्ला!! बेवारस “प्रसाद” गृहनिर्माण संस्थेची अचल संपत्ती वाचवण्यासाठी सभासदांचा टाहो!!! भगवान बाबांचे मंदीर वाचवण्याची असंख्य भक्तांची मागणी.

पाठलाग न्युज ; प्रतिनिधी.

*राष्ट्रसंत भगवान बाबांचे व समाजाचे नाव पुढे करुन केज येथील शिक्षक कॉलनी नजिक प्रसाद गृहनिर्माण संस्थेच्या खुल्या भुखंडावर बावळट व छीछुर्या दलालांचा डल्ला!!

बेवारस “प्रसाद” गृहनिर्माण संस्थेची अचल संपत्ती वाचवण्यासाठी सभासदांचा टाहो!!! भगवान बाबांचे मंदीर वाचवण्याची असंख्य भक्तांची मागणी.

केज :- समाज, जात व दैवत ही माध्यमे पुढे करुन स्वतःची खळगी भरण्याचे व समाजाच्या पुळक्याखाली समाजालाच फसवण्याचे प्रकार भयंकर वाढलेले असतांनाच केज येथील शिक्षक काॅलनी नजिक “प्रसाद “गृहनिर्माण सहकारी संस्था नोंदणी करून, बहुसंख्य प्लाॅट समाजातील सभासदांना वाटप करण्यात आलेले आहेत;परंतु प्लॅन प्रमाणे भगवान बाबांचे मंदीर व मंदिर परिसरातील मोकळ्या जागेचा प्लॅन बेकायदेशीर बदलून सदरच्या मोकळ्या जागेच्या भुखंडावर समाजातील काही दलालांनी दिन दहाडे दरोडा घातल्याचा प्रकार समोर आल्याने केज शहरात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, शहर आराखड्या प्रमाणे राष्ट्रीय संत भगवान बाबांच्या मंदीर परिसरात सोडलेली मोकळी जागा लिलावात काढणार्या समाजविघातक प्रवृत्तींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी अनेक भगवान भक्त व प्रसाद च्या सभासदांनी केली आहे.

या बाबतची सविस्तर माहिती अशी की, केज येथील
*शिक्षक कॉलनी भागातील प्रसाद गृहनिर्माण संस्था सर्वे नं 18 बट्टे 2 मध्ये संस्थेने आपल्या मालकीच्या दोन अडीच एक्कर मध्ये प्लॅन प्रमाणे प्लाॅट वाटप केलेले आहेत. भगवान बाबांचे मंदीर बांधून गार्डनसाठी मोकळा परिसर अरक्षित केलेला आहे. नेमक्या याच ओपन स्पेस मधील जागेत काही दलालांनी अनधिकृत पणे प्लाॅट पाडून त्याची खरेदी विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे . सदरील ओपन स्पेस राष्ट्रसंत भगवान बाबांच्या मंदिरा समोर आहे हे विषेश. मंदिराच्या तिन्ही बाजूंनी अनधिकृत प्लाट काढून त्याची सर्रास विक्री करुन लुट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विषेश म्हणजे ओपन स्पेस मधील प्लाट विक्री करणारे एक निवृत्त शिक्षक, एक विद्यमान शिक्षक तर एक तथाकथित राजकीय पुढारी आहेत. या तिघांचाही “प्रसाद गृहनिर्माण संस्थेशी काहीच सम्बध नाही. टाऊन सिफ्टीची व नगररचना विभागाची कसलिही मान्यता नसताना स्थानिक इंजिनिअर कडून दुसराच बोगस नकाशा तयार करून मोठ्या प्रमाणात कागदपञांची हेराफेरी करण्यात आलेली आहे.या प्रकारात काही अधिकारी वर्गाचा सुद्धा हात असल्याची चर्चा सल्याची
माहिती मिळत आहे.कागदपञांची मोठ्या प्रमाणात हेराफेरी करून हा भुखंड घोटाळा करण्यात आला आहे. वास्तविक कोणत्याही गृहनिर्माण सोसायटी मधील सोडलेला ओपन स्पेस विकता येत नाही.असा माननीय कोर्टाचा आदेश आहे. परंतु सर्व कायदे नियम पायदळी तुडवले जात आहेत. सदर गैरकारभार करून प्लाट विक्री करणाऱ्या विरोधात दि. 12/01/14 रोजी प्रसाद गृहनिर्माण संस्था च्या 27 सभासदांनी लेखी तक्रार दाखल केलेली आहे.परंतू प्रशासनाने या तक्रारीची कसलीही दखल घेतली नसल्याचे दिसत आहे .त्यामुळे या भुमाफियांचे फावले आहे.सदर लेखी तक्रार सहायक निबंधक सहकारी संस्था, केज तहसील कार्यालय केज,नगरपंचायत केज व नगर रचनाकार व विकास विभाग मंञालय मुंबई यांच्या कडे केलेली आहे.प्रसाद गृहनिर्माण संस्था च्या ओपन स्पेस मधील अनधिकृत बेकायदेशीर विकलेल्या प्लाट ची नोंद न करणे बाबत व हरकत घेणे बाबत दि. 06/02/2014 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी नगर पंचायत केज यांच्या कडे पृसाद गृहनिर्माण संस्था च्या 17 सभासदांना सभासदांनी लेखी तक्रार दाखल केलेली आहे.परंतु प्रशासनाने कसलीही कारवाई केलेली नाही.तरी प्रशासनाने त्वरित लक्ष घालून हा भ्रष्टाचार वेळीच रोखावा अशी मागणी होत आहे. या विषयाची तक्रार देखील बाबासाहेब केदार यांनी केलेली आहे. बाबासाहेब केदार यांनी रितसर तक्रार सहायक निबंधक, जिल्हा अधिकारी कार्यालय बीड व नगरविकास विभाग मंञालय यांच्या कडे केलेली आहे परंतु आजपर्यंत कसलीही कारवाई न झाल्यामुळे हा अनागोंदी कारभार चालू आहे. तरी प्रशासनाने वेळीच या अनधिकृत प्लाट विक्री वर रोख आणावी अशी मागणी या सोसायटीचे अधिकृत सदस्य बाबासाहेब केदार सर,वैभव महादेव केंद्रे व नागरिकांनी केली आहे.तसेच राष्ट्रसंत भगवान बाबा मंदिरासमोरील अनधिकृत प्लाटींग ची तिन्ही बाजूंची मोकळी जागा कोणीही खरेदी करु नये असे आवाहान करण्यात आले आहे.
तहसीलदार केज यांनी कारवाई करावी–सौ.रत्नमाला मुंडे.प्रसाद गृहनिर्माण सह.संस्था अवसायनात गेलेली असली तरी,सदर संस्थेची चल अचल संपत्ती ताब्यात घेणे व प्रस्तुत मालमत्तेची चौकशी करणे हे तालुक्याचे तहसीलदार व तालुक्याचे साह्यक उपनिबंधक यांचे आधिकारात असल्यामुळे या प्रकरणात तहसीलदार यांनी लक्ष घालावे व बेकायदेशीर कृत्य करणार्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या महिला संपर्कप्रमुख सौ. रत्नमाला शिवदास मुंडे यांनी केली आहे. आपण या प्रकरणी जिल्हाधिकारी ,बीड यांचे कडे रितसर अपील करत असल्याची महीती त्यानी दिली आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये