भाजपाच्या वतीने केज तालुक्यातील टाकळी येथे वृक्षारोपण संपन्न.
केज / प्रतिनिधी : लोकनेत्या तथा पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. अनावश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रम राबवत आज केज तालुक्यातील टाकळी येथे भाजपा युवा नेते विष्णू घुले तसेच गावातील सर्व ग्रामस्थ यांच्यावतीने नारळ व विविध फळांच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
यावेळी टाकळी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन रघुनाथ बारगजे, बंडू घुले यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. केज तालुक्यातील टाकळी येथे मंत्री पंकजा गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवत केज येथील भारतीय जनता पार्टीचे विष्णू घुले यांनी इत्तर अनावश्यक खर्च टाळून नारळ व विविध फळांचे वृक्ष लागवड करून आपल्या लोकनेत्याचा वाढदिवस साजरा केला. टाकळी गावातील सर्व लोकांना या निमित्ताने प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावायला व जगवायला पाहिजे असा संदेश उपस्थित नागरिकांना विष्णू घुले यांनी दिला जेणेकरून प्रदूषण होणार नाही व झाडे लावल्यामुळे दुष्काळही पडणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावले पाहजे असा संदेश या वृक्षारोपण लागवडीच्या निमित्ताने देण्यात आला. यावेळी चेअरमन रघुनाथ बारगजे, बंडूतात्या घुले, गोरख बारगजे, दिनुभाऊ, यमुनाथ घुले, टि. पी. घुले, सोमनाथ घुले, अशोक बारगजे, भागवत बारगजे, नितीन बारगजे, दिगांबर मुंडे, शिवराम घुले, आश्रुबा घुले, सीताराम चौरे, दिनकर बारगजे, सतिश घुले, सुनिल घुले, भास्कर घुले, भागवत क्षिरसागर, बाबु बुवा भारती, शिवराज घुले, अनिल घुले, आदींसह गावातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.