क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रमोद महाजनांची हत्या कशी झाली? भाजपाच्या माजी खासदार पूनम महाजनांचा गौप्यस्फोट.

पाठलाग न्यूज / वृत्तसंस्था :

प्रमोद महाजनांची हत्या कशी झाली? भाजपाच्या माजी खासदार पूनम महाजनांचा गौप्यस्फोट.

वृत्तसंस्था : भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या हत्येबाबत त्यांच्या कन्या आणि माजी खासदार पूनम महाजन यांनी धक्कादायक दावा केला आहे.

त्या एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होत्या. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रमोद महाजनांची हत्या हे एक मोठे षड्यंत्र होते. याबाबतचे सत्य कधीतरी बाहेर येईलच, असे विधान पूनम महाजन यांनी केले आहे.पूनम महाजन म्हणाल्या की, प्रमोद महाजन यांच्यावर झाडलेली गोळी फक्त एका माणसाच्या रागाची, मत्सराची नव्हती. राग आणि मत्सर होता. कारण त्या गोळीचे पैसे सुद्धा माझ्या वडिलांनीच दिले होते. त्या बंदुकीचे पैसे सुद्धा माझ्या वडिलांनीच दिले होते. पैसे इतके होते की, तुम्ही कोर्ट केसही लढू शकला होता. तुम्ही आयुष्यही घालवू शकला होता. पण ती गोळी एका माणसाच्या रागाची आणि मत्सराची नव्हती. मी नेहमी म्हणते की त्यामागे मोठे षड्यंत्र होते.

आज, उद्या किंवा परवा कधीतरी कळेल, हे षड्यंत्र काय होते. त्यामधून कळेल हे का झाले. दोन भावांमध्ये भांडण काहीच नव्हते. जेव्हा एक देतो आणि दुसरा घेतो, त्यात भांडण काहीच नसते. मला परत या गोष्टीवर जास्त बोलायचं नाही. त्याच्या पुढे जाऊन सांगते, याच्यामागे फार मोठं षडयंत्र आहे. प्रमोद महाजन यांच्या हत्येदिवशी नेमके काय घडलं ?
२२ एप्रिल २००६ रोजी २ मुंबईतील वरळी येथे सकाळी सात वाजता प्रमोद महाजन यांच्या घरी जाऊन त्यांच्यावर त्यांचे बंधू प्रवीण महाजन यांनी तीन गोळ्या झाडल्या होत्या. यात त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, एक दिवस आधी प्रवीण यांनी प्रमोद महाजन यांना मेसेज करून अब न होगी याचना, न प्रार्थना, अब रण होगा, जीवन या मरण होगा, असे लिहिले होते. पांढऱ्या कुर्ता आणि पायजमात असलेले प्रमोद महाजन सकाळी ७ वाजता सोफ्यावर बसून वर्तमानपत्र वाचत बसले होते. त्यावेळी प्रवीण हे त्यांच्या घरी गेले. प्रमोद महाजन यांच्या पत्नी रेखा महाजन यांनी दरवाजा उघडल्यानंतर ते आत आले. प्रवीण हे भावासमोर सोफ्याच्या बसले. रेखा महाजन चहा करण्यासाठी आत गेल्या. त्यानंतर दोघांमध्ये १० मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर भेटीची वेळी घेऊन मगच भेटायला या, असे प्रमोद महाजन म्हणताच प्रवीण यांनी त्यांच्याजवळील रिव्हॉल्वरमधून तीन गोळ्या झाडल्या, आणि ते तेथून निघून गेले.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये