मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब प्रकृती अस्वस्थामुळे विश्रांती घेण्यासाठी साताऱ्यातील त्यांच्या ” दरे ” गावी आले आहेत.
सातारा:राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे प्रकृती अस्वस्थामुळे विश्रांती घेण्यासाठी साताऱ्यातील त्यांचे जन्म गाव असलेल्या “दरे ” या आपल्या गावी आले आहेत.
आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी जास्त वेळ विश्रांती घेणेच पसंत केले आहे.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब दर दोन अडीच महिन्यानंतर आपल्या गावी दरे ( ता महाबळेश्वर) जात असतात. सध्या त्यांची धावपळ व दगदग वाढली आहे. दररोजचे दौरे, बैठका, शिबिरे आदींमुळे प्रवास करावा लागत आहे .त्यांना अजिबात विश्रांती मिळत नाही. आतिश्रमाने त्यांना थकवा जाणवत आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीच्या काही तक्रारी येत आहेत .त्यामुळे आपल्या रोजच्या व्यापातून बाहेर पडून त्यांनी विश्रांतीसाठी आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला. शनिवारी पुण्यातील चांदणी चौकातील नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या रस्त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमालाही ते अनुपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांची तब्येत ठीक नसल्याने ते उपस्थित राहिले नाहीत असे सांगितल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहेत.प्रकृती बिघडल्यानंतर तात्पुरते उपचार घेऊन ते लगेच कामाला सुरुवात करतात. त्यामुळे प्रकृतीच्या तक्रारी वाढत असल्याच्या चर्चा आहेत. त्यांना प्रकृतीची काळजी घेण्याची वेळोवेळी विनंती केली जात असली तरी, ते दुर्लक्ष करून स्वतःला कामात गुंतवून घेतात असे सांगितले जाते . १५ ऑगस्ट नंतर त्यांच्या प्रकृतीची पूर्ण तपासणी करण्यात येणार असल्याचीही माहिती पुढे आली आहे.गावी आल्यानंतर ते आपल्या शेतीला फेरफटका मारणे, शेतीत कामे करणे, गावकऱ्यांशी संवाद साधने, याबरोबरच सातारा प्रशासनाची जिल्ह्यातील अडीअडचणी बाबत माहिती घेणे आणि एक दिवस नागरिकांच्या भेटीसाठी देत असतात परंतु या वेळी त्यांनी सर्वच टाकले असल्याचे निदर्शनास आले आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.