Breaking Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिक्षणातल्या” शालार्थ आयडी'” घोटाळा प्रकरणी राज्यशक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष चितामन वंजारी आणि संभाजीनगर एसएससी बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार याना SIT कडून अटक.

पाठलाग न्यूज / मुंबई:

  • शिक्षणातल्या” शालार्थ आयडी'” घोटाळा प्रकरणी राज्यशिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष चिंतामण वंजारी,आणि संभाजीनगर एसएससी बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार याना SIT कडून अटक.

मुंबई:- नागपूर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी घोटाळ्यामधील ” शालार्थ आयडी'” घोटाळ्याला तोंड फुटल्यानंतर प्रस्तुत घोटाळ्यांचे स्तोम संपूर्ण राज्यभरात पसरले असून, राज्यातील प्रत्येक विभागातला प्रत्येक जिल्हा हा शिक्षण घोटाळ्याने माखल्याचे समोर येताच. या भयाणक घोटाळ्यात बरबटलेल्या उच्चस्तरीय आधिकार्यामध्ये या घोटाळ्याच्या चौकशी समितीचे अध्यक्ष असलेले महाराष्ट्र राज्य मंडळाचे विभागीय अध्यक्ष चितामन वन्जारी यांना परवा गुरुवारी एसआयटीने अटक केली, तर काल शुक्रवारी छत्रपती संभाजी नगर एसएससी बोर्डाच्या सन्माननिय सचिव वैशाली जामदार या महिला आधिकार्याला अटक केल्यामुळे नुकतेच चौइशीच्या रडारवर असलेले बीडसह अनेक जिल्ह्यातील गैर व्यवहारातील  शिक्षणसम्राट व  शिक्षणाधिकारी यांची पाचावर धारण बसली असल्याचे दिसत आहे.

एच एस सी बोर्डाचे सचिव, वैशाली जामदार.                                                                                       दरम्यान, शासन व पोलिसांच्या वेगवेगळ्या नेमण्यात आलेल्या एसआयटीच्या कचाट्यातून शिक्षण घोटाळ्यात संबंध असलेला कुठलाच अधिकारी, संस्थाचालक आणि बोगस नियुक्त कर्मचारी सुटणार नाही याची तंतोतंत दक्षता घेण्यात यावी अशा सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्याने राज्याच्या शिक्षण विभागात कमालीची खळबळ उडाल्याचे चित्र आहे. याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा की,बोगस शिक्षक भरती चा घोटाळा उघडकीस आणणारे विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांनाच या प्रकरणात गुरुवारी अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. नागपूर प्रमाणेच संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षक भरती घोटाळा झाला असून, याची देखील चौकशी सुरु झाल्याने शिक्षणातलेआधिकारी व संस्थाचालकांचे धाबे दणानले आहेत. नागपूर जिल्ह्यात २०१९ पासून गैरमार्गाने ‘शालार्थ आयडी’ प्रदान करून वेतनास पात्र नसलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्यात आले. नागपूर विभागीय उपसंचालक कार्यालयातील कर्मचारी रवींद्र पाटील यांनी १२ मार्च रोजी पोलिसांकडे या घोटाळ्याची तक्रार केली. उल्हास नरड यांच्या सांगण्यावरून ही तक्रार करण्यात आली होती.प्राथमिक माहिती अहवालानुसार, विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने फेब्रुवारी २०२५ मध्ये शिक्षण आयुक्तांना अहवाल सादर केला होता. उपसंचालक कार्यालयाने २११ प्राथमिक शिक्षक, २ मुख्याध्यापक, १८ कनिष्ठ लिपिक, १३ शिपाई अशी २४४ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची यादी दिली होती. त्यानंतर शिक्षण आयुक्तांनी वंजारी यांच्या अहवालाच्या आधारे कठोर भूमिका घेत तपासणी सुरू केली. नागपूर सहित विदर्भात अनेक जिल्ह्यात अशाच पद्धतीने शिक्षक भरती करण्यात आली. त्याचसोबत मराठवाड्यात आणि विशेषत बीड जिल्ह्यात झालेल्या बोगस शिक्षक भरतीची देखील चौकशी सुरु झाली आहे. बीडचे प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी फुलारी आणि शिंदे यांच्या चौकशीसाठी शिक्षण आयुक्त यांची समिती नेमल्यामुळे संस्थाचालक हादरले आहेत. . परंतु,गुरूवारी वंजारी यांच्या अटकेमुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणानलेले आहेत. विशेष म्हणजे, वंजारी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होण्यापूर्वी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी होते.या दरम्यान प्राथमिक शिक्षणाधिकारी असलेले मृत सोमेश्वर नैताम यांची खोटी स्वाक्षरी व अॅप्रोहल करून २०१० ते २०१४ या काळात शिक्षक रुजू झाल्याचे दाखवण्यात आले आहे. तसेच, त्यांचे ‘शालार्थ आयडी’ २०१९ ते २०२५ या काळात निर्माण करण्यात आल्याचा आरोप वंजारी यांच्याकडे बोट दाखवतो, त्यामुळे वंजारी यांना गुरुवारीचअटक करण्यात आली असून,आता या दिशेने तपास केला जात आहे. वैशाली जामदारही एसआयटीकडून अटक तर,: वंजारीना मंगळवारपर्यंत कोठडी. गेले काही दिवस राज्यभर गाजत असलेल्या बोगस शालार्थ आयडी, शिक्षक व शिक्षकेतर भरती घोटाळ्यात शुक्रवारी तत्कालीन शिक्षण उपसंचालक आणि सध्या छत्रपती संभाजी नगर येथे माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सचिव असलेल्या वैशाली जामदार यांना देखील विशेष तपास पथकाने काल शुक्रवारी औरंगाबाद येथून ताब्यात घेतल्याने मराठवाडा विभागातल्या प्रत्येक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांना घेऊन एसआयटी पथक नागपुरात पोहोचणार असल्याची माहिती मिळत आहे. छत्रपती संभाजी नगर एच एस सी बोर्डाच्या सचिव श्रीमती वैशाली जामदार यांचे कडून, या शिक्षण घोटाळ्यातील तपासात अधिकचा उलगडा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गुरुवारी एसआयटीने ताब्यात घेतलेले नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व तत्कालीन प्राथमिक शिक्षण अधिकारी चिंतामण वंजारी यांना आज शुक्रवारी न्यायालयाने 27 मे मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एकंदरीत कधीकाळी चौकशी समितीची सूत्रे वंजारी यांचे कडे होती,आणिआता तेच या प्रकरणात आरोपी असल्याने आता या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याचे सिद्ध झाले आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांची कसून विचारपुस, चौकशी सुरू होती. आजवर फरार असलेला संगणकीय हेराफेरी करणारा महत्त्वाचा आरोपी लक्ष्मण उपासराव मंधाम तसेच माजी उपसंचालक अनिल पारधी या दोघांना विशेष तपास पथकाने यापूर्वीच अटक केली आहे. नुकतीच विशेष तपास पथक अर्थात एस. आय. टी.ची स्थापना करण्यात आली. त्यानंतर अल्पावधीत या चार मोठे अधिकारी जाळ्यात आले आहेत. आता आणखी मोठे मासे जाळ्यात येण्याची आणि सखोल चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे पुढे सापडण्याची शक्यता आहे. बनावट शालार्थ आयडीच्या माध्यमातून पाचशेवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रकरणी सायबर तसेच सदर पोलिसांनी विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड, शिक्षक पराग पुडके, निलेश मेश्राम, भारत ढवळे, सुरज नाईक, संजय बडोदकर यांना अटक केली. नरड यांच्या चौकशीत संगणकाच्या बाबतीत निष्णात असलेल्या मंघम याचे नाव समोर आले. बोगस आयडी तयार करण्यासाठी ज्या आयपी अॅड्रेसचा वापर झाला. त्यातील सर्वाधिक आयपी हे फरार आरोपी मंघम याचे होते असेही चौकशीत पुढे आले आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये