महाराष्ट्र

जातीयवादाच्या विळख्यात ..महाराष्ट्र माझा..!

पाठलाग न्युज:

जातीयवादाच्या विळख्यात ..महाराष्ट्र माझा..!

रोज अशा गोष्टी ऐकायला मिळतात,कि ,अमुक जात मोठी,तमुक जात छोटी..या छञपतींच्या महाराष्ट्रात जातीवादाच्या ठिणग्या कोण टाकत आहेत,आणि आरक्षणाच्या भावनिकतेतून जातीचा वापर चक्क राजकारणासाठी केला जात असल्याचे आता भयानकत्व समोर आलं आहे. छञपती शिवाजी महाराज हे जातीयवादी नव्हते,बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेवुन त्यांनी महाराष्ट हा गनिमांच्या तावडीतून सोडवून, हिंदवी स्वराज्य स्थापन करुन,अवघ्या महाराष्ट्रातील जनतेवरील अन्याय-अत्याचार संपवला होता. हे आजचे अधूनिक समाजसेवक विसरलेत. छत्रपतीं शिवाजी महाराज हे सर्व गूण संपन्न राजा असुन ही त्यांनी कधी कोणालाच जातीवरुन अपमानित केले नव्हते.उलट,प्रत्येक समाजाच्या व्यक्ती ला त्यांच्या दरबारात मान-सन्मान होता., असे इतिहास सांगतो. त्यांच्या नंतर छञपती संभाजी महाराज,छञपती शाहू महाराज यांनीही,प्रत्येक जातीधर्माचा मान- सन्मान जपला. तसेच संविधानाचे जनक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तर अनिष्ट रुढी-परंपरांगत चालत आलेल्या अविवेकी,चालीरितींना संपवुन,मनुवादी दूष्ट विचार मातीत गाडले,आणि देशातल्या प्रत्येक व्यक्तीला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार दिला. संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज , संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराज,संतश्रेष्ठ ह.भ.प.भगवान बाबा,संत श्रेष्ठ सेवालाल महाराज,राष्ट्रसंत गाडगेमहाराज,संत तुकडोजी महाराज अशा अनेक संत महात्म्यांनी एकात्मतेची, कल्याणकारी शिकवण किर्तन,प्रवचनाच्या माध्यमातून जनजागृती केली. जणकल्यानासाठी ,आपल्या देशाच्या प्रगतीसाठी अनेक समाज सुधारकांनी आपली आयूष्य घालवली. अशा महान विभुती आपल्या देशात होवुन गेल्या. राजकिय नेते म्हणुन यशवंतराव चव्हाण,लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब,विलासराव देशमुख,प्रमोदजी महाजन,असे अनेक महान नेते होवुन गेले.अजरामर झाले.

त्यांचे स्मरण आज प्रत्येकाने आठवणे गरजेचे झाले आहे.त्या महापुरुषांची कार्ये,त्यांची शौर्ये, त्यांचे त्याग,त्यांचे देशाप्रती चे असणारे प्रेम आणि कार्याची आठवण मानसांमध्ये नवचैतन्य निर्माण करते.हे आपल्या देशाचे,आपल्या महाराष्ट्राचे प्रेरणादायी वैभव आहे. यांच्या क्रांतीकारी विचारांची धारा प्रत्येकांनी स्मरणात ठेवुन ती अचरणात आणावी अगदी अशीच परिस्थिती असतांना अलिकडे काही समाजकंटक त्यांच्या नावाचा ढालीसारखा वापर करुन जातीजातीमध्ये तेढ निर्माण करत असल्याचे चित्र आहे. आजच्या यूवकांना समाजविघातक कार्य करण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. त्यांची आयूष्य बरबाद केली जात आहेत. आजची काही तरूण पिढी हि,अशा लोकांमुळे भरकटत चालली आहे. आणि त्यांचा हे समाजकंटक त्यांना भावनिक बनवून पुरेपूर गैर फायदा घेत आहेत. आरक्षणाचा मुद्दा असेल,किंवा जातीपातीचा मुद्दा असेल,त्यात काही अंशी तरुण पिढी हिरीरीने पुढे आहे. आरक्षण वगैरे संविधानातील तरतुदीनुसार साध्य होईलच परंतु , आरक्षण आंदोलनाचे माध्यम वापरुन जातीयवादाचा खतपाणी घालत त्याचा उपयोग राजकारणासाठी केला जात असल्याचे भयानक चित्र राज्यात दिसत आहे. पण,हे कुठे तरी थांबलं पाहिजे,कुठल्यातरी आकसापोटी,अतिरेकी समाजकंटकाच्या सांगण्यावरुन कोणाची घरे जाळणे,सामाजिक दुही निर्माण करणे,सरकारी प्राॅपर्टीचे नुकसान करणे,अशा गोष्टी ही अशा लोकांकडून सर्रास घडतात. कायद्याचे सतत उलंघन जाणून बूजुन केले जाते. आपल्या हक्कासाठी,आणि न्यायासाठी प्रत्येकाने लढायला हवं,पण,कायद्याची पायमल्ली करुन,अथवा,सामाजिक दूही निर्माण करुन नव्हे! हे देशासाठी,आपल्या राष्ट्रासाठी,विनाशकारी आहे.आपण आपल्याच महापुरुषांची,आपल्या विविध जातीधर्माने नटलेल्या परंपरांची,आपल्या संस्कृती ची अवहेलना करतोय का? याचा आजच्या पुढारलेल्या तरुणाईने बारकाईने आणि सद्सद्विवेक बुद्धी ने विचार नक्कीच करायला हवा.

सौ. रत्नमाला शिवदास मुंडे.
शिवसेना महिला संपर्कप्रमुख,नांदेड-हिंगोली.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये