ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

संगीताताई ठोंबरे यांच्या पहिल्याच मॅरेथॉन बैठकांना तुफान गर्दी. “तुम्ही मला मतदान करा विकास काय असतो ते मी दाखवून देईन!!” केज विधानसभेच्या अपक्ष उमेदवार संगीता ठोंबरे यांचे मतदारांना वचन.

पाठलाग न्यूज / निवडणूक प्रतिनिधी:

संगीताताई ठोंबरे यांच्या पहिल्याच मॅरेथॉन बैठकांना तुफान गर्दी.

“तुम्ही मला मतदान करा विकास काय असतो ते मी दाखवून देईन!!” केज विधानसभेच्या अपक्ष उमेदवार संगीता ठोंबरे यांचे मतदारांना वचन.

केज / प्रतिनिधी:’जनता हाच माझा पक्ष’ हे ब्रीद वाक्य घेऊन केज विधानसभेच्या कुरुक्षेत्रावर सर्व ताकतीनिशी उतरलेल्या भाजपाच्या माजी आमदार संगीताताई ठोंबरे यांनी उमेदवारी फॉर्म भरल्याबरोबर प्रचारात मुसंडी मारली असून, त्यांनी मतदारसंघात मॅरेथॉन बैठका घेण्याचा सपाटा लावला आहे. त्या सध्या ज्या गावात प्रचाराला जात आहेत तेथे ताई आल्या म्हणताच आपोआप गर्दी जमा होताना दिसून येत आहे. दिनांक 31 गुरुवार रोजी त्यांनी मतदार संघातील अनेक गावांना भेटी दिल्या आहेत. विकासाभिमुख नेतृत्व असलेल्या केज विधानसभेच्या अपक्ष उमेदवार संगीताताई ठोंबरे यांनी मतदार संघातील तांबवा, तरनळी, कासारी नागजरी, उंबरी, सावंतवाडीसह अनेक गावांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी मतदारांनसोबत संवाद साधत व मतदानरुपीआशीर्वाद देऊन सहकार्य करा मी आमदार झाल्यास आमदार मी नसून तुम्ही सगळे आमदार होणार असे वक्तव्य त्यांनी प्रत्येक गावात केलें आहे. मी मतदार संघात आमदार असणाऱ्या पाच वर्षाच्या काळात केज विधानसभा मतदार संघात अनेक समाज उपयोगी कामे केली मी मतदार संघात एसटी बस स्टॅन्ड, केज मध्ये एकही सभागृह नव्हते ते मी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नावाने पाच कोटी रुपयांचे सभागृह आणण्याचे काम माझ्या कार्यकाळात केले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मतदार संघातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेले मांजरा धरण व त्यात तीन टीएमसी पाणी आणण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले व नागपूर येथे विधान भवन समोर बसून एक दिवसाचे उपोषण देखील मी केलेले असल्याचे त्या म्हणाल्या. अशा प्रकारचेअनेक मुद्दे घेऊन भाजपाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे ह्या मतदारसंघात मतदारांपर्यंत जात आहेत. संगीता ताई ठोंबरे यांच्या गाव भेटी दौऱ्याला उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. आपल्या मॅरेथॉन दौऱ्यात बोलताना त्या म्हणाल्या की यावेळी कोणताही पक्ष नसला तरी, वेळ आल्यास मी मतदार संघातील जनतेसाठी तन-मन-धन लावून काम करण्याचा विश्वास त्यांनी दिला. फक्त तुम्ही मतदान रुपी आशीर्वाद देऊन मला निवडून द्या वर आपली सर्वांची सेवा करण्याची संधी मला एकदा द्या असे गौरव उद्गार त्यांनी काढले. माजी आमदार संगीता ताई ठोंबरे यांच्या मॅरेथॉन बैठकादरम्यान गावोगावी मिळणारी गर्दी पाहून त्या सुद्धा आवक होता ना दिसून येत आहेत.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये