Breaking Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अंबाजोगाई तालुक्यातील दत्तपुर ग्रा.प. मधील प्रकार. ग्रामसेवकाकडून ग्रामरोजगार सेवकाच्या मानधनाचा अपहार; ७५ हजार रुपयांच्या रकमेवरून खळबळ,आत्मदहनाचा इशारा.

पाठलाग न्यूज / प्रतिनिधी :

अंबाजोगाई तालुक्यातील दत्तपुर ग्रा.प. मधील प्रकार. ग्रामसेवकाकडून ग्रामरोजगार सेवकाच्या मानधनाचा अपहार; ७५ हजार रुपयांच्या रकमेवरून खळबळ,आत्मदहनाचा इशारा.

​अंबाजोगाई: अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामपंचायत दत्तपूर येथील ग्रामसेवकाने ग्रामरोजगार सेवक (सहाय्यक) यांच्या हक्काच्या मानधनाची रक्कम परस्पर हडप केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाअसून, पांडुरंग भीमाशंकर पुरी या ग्रामरोजगार सेवकाच्या हक्काचे ग्रामपंचायत च्या बँक खात्यात शासनाने जमा केलेले तब्बल ७५,२९३/- रुपये ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) यांनी बेकायदेशीरपणे काढल्याची तक्रार त्यांनी थेट जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.), बीड यांच्याकडे केली आहे.या बाबतचा सविस्तर वृतांत असा की, ​पांडुरंग भीमाशंकर पुरी हे २००८ पासून अंबाजोगाई तालुक्यातील दत्तपूर येथे ग्रामरोजगार सेवक (सहाय्यक) म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या निवेदनानुसार, शासनाने त्यांना मंजूर केलेले मानधन दोन टप्प्यांत दत्तपूर ग्रामपंचायत च्या खात्यावर जमा झाले होते. ​पहिला टप्पा: दि. १७/१२/२०२४ रोजी मा. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आदेशानुसार मंजूर रु. ४४,१९३/- ​दुसरा टप्पा: दि. २४/१०/२०२५ रोजी मंजूर झालेले रु. ३१,१००/- ​या दोन्ही रकमांची एकूण बेरीज रु. ७५,२९३/- होते. ही रक्कम ग्रामरोजगार सेवक पुरी यांना मानधन म्हणून मिळालेली असताना, दत्तपूरचे ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) यांनी ‘परस्पर’ काढून घेऊन अपहार केला असल्याचे ​बँक स्टेटमेंटमधून उघड झाले आहे.​पुरी यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँक, अंबाजोगाई येथील प्रस्तुत खात्याचे स्टेटमेंट तपासले असता, हा अपहार त्यांच्या निदर्शनास आला. संबंधित ग्रामसेवक जाणूनबुजून आपला मानसिक व आर्थिक छळ करत असल्याचा आरोपही तक्रारदार पुरी यांनी केला आहे. ​तक्रारदाराचा ‘आत्मदहनाचा’ गंभीर इशारा. या आर्थिक छळाला कंटाळून तक्रारदार पांडुरंग पुरी यांनी आपल्या तक्रार अर्जात एक अत्यंत गंभीर इशारा दिला आहे. ‘ग्रामसेवक आणि संबंधितांच्या छळाला कंटाळून मला आपल्या कार्यालयासमोर आत्मदहन करावे लागेल, कृपया ह्याची नोंद घ्यावी,’ अशी नम्र विनंती त्यांनी जिल्हा परिषद कार्यालयाला केली आहे. !!​उच्च अधिकाऱ्यांकडे धाव!! ​ग्रामरोजगार सेवक पुरी यांनी या प्रकरणी तातडीने चौकशी करून ग्रामसेवकावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी आणि आपले हक्काचे मानधन परत मिळवून द्यावे, अशी मागणी केली आहे. या तक्रारीची एक प्रत मा. जिल्हाधिकारी साहेब (बीड), मा. गट विकास अधिकारी (पं.स. अंबाजोगाई), तसेच राज्याचे मनरेगा मंत्री मा. भारत गोगावले आणि स्थानिक खासदार मा. बजरंग बप्पा सोनवणे साहेब यांच्याकडेही पाठवण्यात आली आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये