सहाय्यक पोलिस अधिक्षक श्री.कमलेश मीना यांची धडाकेबाज कारवाई,.९,५८,००० रुपयांचे गोवंश जातीचे जनावरे कत्तलखान्यात जाण्या पासुन रोखले.
केज /प्रतिनिधी:केज उपविगाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.कमलेश मीना यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने गोवंश जातीची जनावरे कत्तल खाण्यात जाणाऱ्या वाहनावर कारवाई करत ९,५८,००० रूपये किंमतीचे गोवंश जातीच्या जनावरांसह वाहतुकीसाठी वापरले जाणारे आयशर टँम्पो सह जप्त करुन तीन आरोपींच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरात खळबळ माजली आहे.याबाबतचा वृत्तांत असा की,दिनांक ३० एप्रिल २०२४ रोजी पहाटे तीन वाजण्या च्या सुमारास सहाय्यक पोलीस अधिक्षक,उप विभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग केज यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,एक आयशर टँम्पो क्रमांक एम.एच. ०४ ई.एन.३७३५ यामध्ये गोवंशजातीचे जनावरे भरुन ती कत्तलीसाठी बेकायदेशीररित्या केज येथुन अंबाजोगाईकडे अवैद्य वाहतुक करीत आहे.अशी माहिती मिळाल्यावरुन सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. कमलेश मीना यांच्या पथकातील दिलीप गित्ते, पोलीस नाईक विकास चोपने,अनिल मंदे,पोलीस ठाणे केज येथील चालक पोलिस हवालदार,पोलिस नाईक दराडे,पोलिस नाईक भंडाणे यांना सदर वाहन ताब्यात घेवुन कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याने वर नमुद पथकातील पोलीस अंमलदार यांनी पिसेगाव फाटा येथे थांबवुन पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारासवर नमुद वाहन ताब्यात घेतले,वाहनाचे चालक यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव जाकेर खाजाभाई खुरेशी,वय २२ वर्ष रा.विडा ता.केज जि.बीड असे सांगीतले तसेच सदर जनावरे कोणाच्या मालकीचे आहेत याबाबत विचारणा केली असता सदरचे जनावरे हे दिलीप आश्रुबा घोरपडे,अप्पाराव दिलीप घोरपडे,दोन्ही रा.विडा ता. केज जि.बीड असे सांगीतले, पथकातील कर्मचारी यांनी सदरच्या वाहनाची पाहणी केली असता खिलार जातीचे बैल व एक जर्सी जातीचे बैल असे होते,सदर गोवंश जातीतील जनावर हे शेती कामाचे व्यापारासाठी घेवुन जात असल्याचे दिसावे म्हणुन सदर जनावराचे अंगावर गुलाल टाकल्याचे दिसुन आले.सदरचे चालक यास जनावरे कोठे घेवुन जात आहात ? याबाबत विचारणा केली असता सदरचे जनावरे हे नळेगाव येथील बाजारात घेवुन जात असल्याबाबत सांगीतले.त्यांना जनावराच्या दाखले,पावत्या कागदपत्रा विषयी विचारणा करता त्यांच्या कडे कागदपत्र मिळुन आले नाही.वरील वर्णनाचे अकरा खिलार जातीचे बैल व एक जर्सी जातीचे बैल गोवंश जातीचेजनावरे व आयशर सह एकूण ९,५८,००० रुपये किमतीचा माल जप्त केला.तरी यातील आरोपी क्रमांक ०१ ते ०३हे गोवंश जातीचे जनावरे क्रूरतेने निर्दयीपणे क्षमतेपेक्षा जास्त भरुन आयशर टँम्पोमध्ये भरुन ते व्यापाराचे जनावर आहे असे दाखवण्यासाठी त्यांच्यावर गुलाल टाकुन त्यांची कत्तल करण्या साठी घेवुन जात असतांना मिळुन आल्याने वर नमुद आरोपी विरुध्द पोलीस नाईक दिलीप गित्ते यांचे फिर्यादीवरुन पोलीस ठाणे केज येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही बीड चे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.कमलेश मीना,सहाय्यक पोलीस अधीक्षक, उपविभाग केज यांच्या आदेशाने पोलीस नाईक दिलीपगित्ते,अनिल मंदे,विकासचोपने,पोलीस हवालदार दराडे,पोलीस नाईक भंडाणे यांच्या पथकाने केली आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.