ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

परिसरातील दारुचे अड्डे बंद करण्याच्या मागणीसाठी,पालकमंत्र्यासमोर असंख्य महीलांचा टाहो! तुकूचीवाडी-जिवाची वाडीआणि परिसरातील लोकांचे प्रेम पाहून भारावून गेलो – पालकमंत्री धनंजय मुंडे.

पाठलाग न्युज/अप्पाराव सारुक:

परिसरातील दारुचे अड्डे बंद करण्याच्या मागणीसाठी,पालकमंत्र्यासमोर असंख्य महीलांचा टाहो!
तुकूचीवाडी-जिवाची वाडीआणि परिसरातील लोकांचे प्रेम पाहून भारावून गेलो – पालकमंत्री धनंजय मुंडे.

केज: केज तालुक्यातील जीवाचीवाडी येथील लोकनेते तथा बहुजनांचा नेता स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाच्या प्रवेशद्वाराचे लोकार्पण राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले.दरम्यान, केज तालुक्यातील गावागावातून ग्रामस्थांकडून मा. धनंजयजी मुंडे यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर; घरांपुढे रांगोळी सजवून औक्षणासह स्वागत करण्यात आले.

जीवाचीवाडी आणि विडा परिसरात दारु आणि जुगारांच्या अड्डयांचा हलकल्लोळ मातल्यामुळे परिसरातील असंख्य तरुण व्यसनाधिन व जुगाराच्या आहारी गेल्यामुळे अनेकांचे जिवन तारुण्यातंच उध्वस्त होत आहे.त्यामुळे आपण पालकमंत्री या नात्याने परिसरातील दारु व जुगाराचे अड्डे बंद करावेत अशा मागणीचे निवेदन असंख्य महीलानी पालकमंत्री ना.मुंडेनां दिले. ना. मुडे बोलतानां म्हणाले की बऱ्याच वर्षानंतर केज तालुक्यातील जीवाचीवाडी, तुकूची वाडी आणि या परिसरात येण्याची संधी आज मला मिळाली आहे, आज जागोजागी ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात आणि ज्या प्रेमाने माझे स्वागत केले ते प्रेम पाहून मी भारावून गेलो आहे. मुंडे कुटुंबावर असलेल्या या प्रेमातूनच आम्हाला जनतेची सेवा करण्याची ऊर्जा मिळते आणि ही ऊर्जा माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत अशीच साठवून ठेवीन व आपली सेवा करत राहीन, असे वक्तव्य राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी तुकोचीवाडी येथील जाहिर सभेत केले आहे. जिवाचीवाडी येथे उभारण्यात आलेल्या लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे प्रवेशद्वाराचे आज मंत्री धनंजय मुंडे यांच्या शुभ्भ हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी जीवाचीवाडी तसेच तुकूची वाडी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहास देखील भेट देत ग्रामदैवतांचे आशीर्वाद घेतले व गावकऱ्यांशी संवाद साधला.ना. धनंजय मुंडे हे केज तालुक्यातील जिवाची वाडी व तुकोची वाडी या गावांना भेट देण्यासाठी येत असताना धारूर तालुक्यातून केज तालुक्याच्या हद्दीत प्रवेश झाल्यानंतर तुकूची वाडी येथे पोहोंचे पर्यंत रस्त्यातील प्रत्येक गावागावात वस्ती वस्तीवर धनंजय मुंडे यांचे स्थानिक ग्रामस्थांनी व माता-भगिनींनी स्वागत केले. घराघरांपुढे रांगोळ्या काढून तर औक्षण करून मायमाऊलींनी धनंजय मुंडे यांना भरभरून आशीर्वाद दिले.दरम्यान राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावयाच्या अनुदानाबद्दलची माहिती देण्यासह मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते महिला भगिनींना पोहोचले आहेत का, असा प्रश्न धनंजय मुंडेंनी सभेत विचारताच महिला भगिनींनी मोठ्या उत्साहात ‘होय’ म्हणत शासनाचे आभार मानले.पुढे बोलताना धनंजय मुंडे यांनी परळी वैजनाथ येथे येत्या 21 तारखेपासून सुरू होत असलेल्या पाच दिवशीय राज्यस्तरीय कृषी महोत्सवास उपस्थित राहण्यासंदर्भात सर्व शेतकरी बांधवांना निमंत्रित केले. यावेळी माजी आमदार केशवराव आंधळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विष्णू चाटे,भाजपाचे जेष्ठ नेते रमाकांत बापु मुंडे, विडा जि.प.चे कार्यरत सदश्य विजयकांत भैय्या मुंडे, भगवान सेनेचे मुरलीबप्पा ढाकणे, बंन्सीभाऊ मुंडे,सारंग आंधळे, नंदू दादा मोराळे, संजय केदार, बालाजी तांदळे, जीवाचीवाडी गावचे दिपक काळे, नागझरीचे सरपंच चंद्रसेन चौरे, रोहित हंगे, किरण राऊत, सुदर्शन घुले, यांसह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये