संस्थाचालकाने किमान वेतन न दिल्याने आत्महत्या केलेल्या शिक्षकास ऍड. माधव जाधव यांच्याकडून 25 हजाराची मदत.
केज – केज तालुक्यातील देवगाव येथील रहिवासी आणि केज तालुक्यातील बेलगाव येथे कार्यरत असलेल्या संस्थाचालक विक्रम बाप्पा मुंडे यांच्या गजराम मुंडे आश्रम शाळेतील शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी प्रस्तुत आश्रम शाळेत अठरा वर्षे नौकरी करुनही किमान वेतन मिळत नसल्याने बीड येथील कृष्णा अर्बन बँकेच्या शाखा कार्यरत असलेल्या आश्रम शाळेच्या सचिवाच्या निवासस्थानासमोर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. धनंजय नागरगोजे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या तीन वर्षाच्या लहान मुलीला उद्देशून फेसबुक पोस्ट करत आणि सुसाईड नोट लिहून व्हायरल करत संस्थाचालकाच्या दारात स्वतःची जीवन यात्रा संपवली. मयत शिक्षक धनंजय नागरगोजे यांना तीन वर्षाची एक लहान मुलगी असून,पत्नीच्या पोटात सहा महिन्याचे आपत्य आहे. घरामध्ये धनंजय नागरगोजे च्या विराहाने कोलमडलेले वृद्ध आई-वडील आहेत. अशा परिस्थितीमध्ये धनंजय नागरगोजे यांनी अतिशय टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले आहे. अशा पीडित कुटुंबासाठी मदतीचे हात पुढे येणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतेच मयत धनंजय नागरगोजे यांच्या दोन्ही लेकरांच्या शिक्षणाचा भार उचलण्याचे आश्वासन दिले असून, त्याच अनुषंगाने अॅड. माधव जाधव यांनी देवगाव ता. केज जिल्हा बीड येथे जाऊन मयत धनंजय नागरगोजे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. मयत धनंजय नागरगोजे यांचे वडील अभिमान नागरगोजे व भाऊ गणेश नागरगोजे यांच्याकडे जय भारती बहुउद्देशीय सेवाभावी प्रतिष्ठान मार्फत 25000 रुपयाचा धनादेश देऊन या कुटुंबाला आधार दिला.
यावेळी अॅड माधव जाधव यांचे सोबत अॅड. रणजीत खोडसे, देविदास नागरगोजे, सुनील घोळवे, शरद मुंडे, अशोक नागरगोजे, सदाशिव मुंडे, अॅड. एस. एल. गलांडे, अॅड. एस. व्ही. गलांडे, अॅड. एम. एल. भोसले, अॅड. पी. डी. इतापे, अॅड. कोनैण काझी, सुग्रीव आप्पा अंबाड व ग्रामस्थ ऊपस्थीत होते.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.