नांदेड – पोलीस खात्यामध्ये दबंग कामगिरीचा ठस्सा उमटवलेले आणि बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई उपविभागाचे प्रशिक्षणार्धी पोलीस उपाधिक्षक असतांना पासूनच गुन्हेगारांचा “गर्दनकाळ” म्हणून ओळख असलेले शहाजी उमाप हे 30 जुलै रोजी नांदेड IG (पोलीस महानिरीक्षक) पदाचा पदभार स्वीकारण्याची शक्यता असून, सध्याचे आयजी शशिकांत महावरकर हे पिंपरी चिंचवड येथे पोलीस सह आयुक्त पदावर रुजू होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, नांदेड परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षक पदावर शहाजी उमाप यांची सरकारने नियुक्ती केली आहे.नांदेड परिक्षेत्राच्या आयजी पदावर अर्थात पोलीस महानिरीक्षकपदी शासनाने शहाजी उमाप यांची नियुक्ती केली असली तरी या पदावर सध्या कार्यरत असलेले शशिकांत महावरकर यांची पोलीस महानिरीक्षक सीआयडी ,पुणे या पदावर बदली करण्यात आली होती. मात्र, शशिकांत महावरकर हे या बदली आदेशाविरुद्ध न्यायालयात (कॅट) गेले होते; त्यानंतर न्यायालयाने या बदलीला 19 जुलै पर्यंत स्थगिती आदेश दिला होता. यावर दि. 19 रोजी कॅट मध्ये सुनावणी झाली,त्या निर्देशानुसार शहाजी उमाप हे साधारणतः दि. 30 जुलै रोजी पर्यंत नांदेड आयजी पदाचा पदभार घेण्याची शक्यता आहे.न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान शासनाने शशिकांत महावरकर यांना नवीन जागी नियुक्तीसाठी चार पर्याय न्यायालयापुढे ठेवले होते. त्यात पिंपरी चिंचवड सहआयुक्त पदाचाही समावेश असून शशिकांत महावरकर हे या पदावर बदली होऊन जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
न्यायालयाने याप्रकरणी दि. 29 जुलै रोजी पुढील सुनावणी ठेवलेली असून त्यानंतर शहाजी उमाप हे नांदेड येथे आयजी पदाचा पदभार स्वीकारण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.शहाजी उमाप हे पोलीस खात्यामध्ये दबंग कामगिरीचा ठस्सा उमटवलेले आणि सुरुवातीलाच बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई उपविभागाचे प्रशिक्षणार्धी पोलीस उपाधिक्षक असतांना पासूनच गुन्हेगारांचा “गर्दनकाळ” म्हणून ओळख असलेले शहाजी उमाप हे 30 जुलै रोजी नांदेड IG (पोलीस महानिरीक्षक) पदाचा पदभार स्वीकारण्याची शक्यता असून, सध्याचे आयजी शशिकांत महावरकर हे पिंपरी चिंचवड येथे पोलीस सह आयुक्त पदावर रुजू होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, नांदेड परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षक पदावर शहाजी उमाप हे निश्चित रुजू होणार हे स्पष्ट झाले आहे. नांदेड परिक्षेत्राच्या आयजी पदावर अर्थात पोलीस महानिरीक्षकपदी शासनाने शहाजी उमाप यांची नियुक्ती केली होती. परंतु या पदावर सध्या कार्यरत असलेले शशिकांत महावरकर यांची पोलीस महानिरीक्षक सीआयडी ,पुणे या पदावर बदली करण्यात आली होती. मात्र, शशिकांत महावरकर हे या बदली आदेशाविरुद्ध न्यायालयात (कॅट) गेले होते; त्यानंतर न्यायालयाने या बदलीला 19 जुलै पर्यंत स्थगिती आदेश दिला होता. यावर दि. 19 रोजी कॅट मध्ये सुनावणी झाली,त्या निर्देशानुसार शहाजी उमाप हे साधारणतः दि. 30 जुलै रोजी पर्यंत नांदेड आयजी पदाचा पदभार घेण्याची शक्यता आहे. न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान शासनाने शशिकांत महावरकर यांना नवीन जागी नियुक्तीसाठी चार पर्याय न्यायालयापुढे ठेवले होते. त्यात पिंपरी चिंचवड सहआयुक्त पदाचाही समावेश असून शशिकांत महावरकर हे या पदावर बदली होऊन जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.न्यायालयाने याप्रकरणी दि. 29 जुलै रोजी पुढील सुनावणी ठेवलेली असून त्यानंतर शहाजी उमाप हे नांदेड येथे आयजी पदाचा पदभार स्वीकारण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.