लाचलुचपतच्या सापळ्यातून पळालेला अंबाजोगाई सा.बा.विभागाचा तात्कालीन कार्यकारी अभियंता पत्नीसह सापडला अपसंपदेच्या जाळ्यात!!बीड :- प्रशासनातील लाचखोर अधिकाऱ्यांनी देशभरात थैमान माजवले आहे;’नागरिकाचे काम अडविण्यासाठी शासनाची पगार आणि,सदरचे अडविण्यात आलेले काम करण्यासाठी लाच’ असेच सुत्र जिकडे-तिकडे चालू असतांनाच गुत्तेदारीचे बील काढण्यासाठी ३० हजाराची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यातून सहीसलामत व तांत्रिक मुद्यांवर पळालेला अंबाजोगाई सा.बा. विभागाचा तात्कालीन कार्यकारी अभियंता अखेर आपल्या सुविद्य पत्नीसह अपसंपदा तथा बेहिशोबी मालमत्तेच्या जटिल जाळ्यात सापडला आहे.दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ‘पाठलाग’मुळे त्याच्या अपसंपत्तीमद्दे नौकरीतून मिळणाऱ्या उत्पन्ना पेक्षा जमवलेली संपत्ती कितीतरी पट्टीत जास्त असल्याचे निष्पन्न झाल्यावरुन अंबाजोगाई पोलीसात गुन्हा दाखल करण्यआत आला आहे.या बाबत सविस्तर वृत्तांत असा की, आंबेजोगाई येथे 2022 मध्ये कार्यरत असलेले बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुमार ककोकणे हे अंबाजोगाई येथे कार्यरत असतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईतुन पळून सध्या कार्यकारी अभियंता विकास विभाग क्रमांक चार अंधेरी मुंबई येथे कार्यरत आहेत. त्याचेविरुद्ध 22 फेब्रुवारी 2022 रोजी लाचखोरी प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध एसीबी कडून आंबेजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्दा दाखल करण्यात आला होता,परंतू तांत्रिक मुद्यांवर ते अंधेरी मुंबई येथे रुजू झाले होते. त्यानंतर एसीबीने त्यांच्या मालमत्तेच्या चौकशी करिता परीक्षण करण्यात आले.एक सप्टेंबर 2010 ते 22 जून 2022 पर्यंतच्या कालावधीत तात्कालीन कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आंबेजोगाई संजय कुमार शशिकांत कोकणे यांच्या उत्पन्नामध्ये कायदेशीर मार्गाने व ज्ञात असलेल्या उत्पादनापेक्षा 238.84 टक्के म्हणजेच तीन कोटीहून अधिक संपत्ती असल्याचे एसीबीच्या चौकशीत निष्पन्न झाले. तसेच त्यांची पत्नी ज्योती संजय कुमार कोकणे या
गृहणी असतांना आणि कुठलाही व्यवसाय करत नसतांना यांच्या नावे एक कोटी बारा लाख 60 हजार रुपयाची अप संपत्ती असल्याचे एसीबी च्या निदर्शनास आले आहे. उत्पन्न सव्वा कोटी, मालमत्ता अडीच कोटी आणि खर्च पावणेदोन कोटी रूपये एवढी उधळपट्टी करूनही तीन कोटींची अपसंपदा कमावणाऱ्या अंबाजोगाईच्या कार्यकारी अभियंत्याविरोधात अंबाजोगाईत अपसंपदाचा गुन्हा दाखल झाला आहे.कार्यकारी अभियंत्याला मुंबईतून ताब्यात घेतले आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात आतापर्यंत एवढ्या मोठ्या रक्कमेचा पहिल्यांदाच अपसंपदाचा गुन्हा दाखल झाल्याचे एसीबीकडून सांगण्यात आले. संजयकुमार शशिकांत कोकणे (वय ५१) व ज्योती संजयकुमार कोकणे (रा. पाखल रोड, नाशिक) अशी आरोपींची नावे आहेत.कोकणे हा अंबाजोगाई येथील बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता होता.सध्या तो अंधेरी, मुंबई येथे त्याच पदावर कार्यरत आहे. त्याची पत्नी ज्योती कोकणे यागृहिणी आहेत. कोकणे याला २०२२ मध्ये ३० हजार रुपयांची लाच घेताना
‘एसीबी’ने रंगेहात पकडले होते. त्याची घरझडती घेतली असता त्यावेळी लाखो रुपये सापडले होते. त्यानंतर ‘एसीबी’ने परवानगी घेऊन त्याच्या मालमत्तेची चौकशी केली असता त्याच्याकडे उत्पन्न, खर्च, मालमत्ता वगळून त्याच्याकडे ३ कोटी २ लाख ६४ हजार १४१ रुपयांची अपसंपदा आढळली.हा सर्व आकडा १ सप्टेंबर २०१० ते २२ जून २०२२ या दरम्यानचा आहे.याप्रकरणी ज्योती कोकणे व संजयकुमार कोकणे यांच्याविरोधात अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या नेतृत्वाखाली उपअधीक्षक शंकर शिंदे, सुरेश सांगळे, हनुमंत गोरे, संतोष राठोड, स्नेहलकुमार कोरडे, भारत गारदे अदीनी कारवाई केली होती.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.