क्राईम न्युजमहाराष्ट्र

यशवंतराव चाटे शिक्षण संस्थेचे सचिव शिवाजी चाटेवरील रास्त गुन्हा पुराव्यांच्या अयोग्य मांडणीमुळे अखेर रद्द.

पाठलाग न्युज/प्रतिनिधी:

  1. यशवंतराव चाटे शिक्षण संस्थेचे सचिव शिवाजी चाटे वरील रास्त गुन्हा पुराव्यांच्या अयोग्य मांडणीमुळे अखेर रद्द.

केज /प्रतिनिधी: सन्माननीय न्यायालयाची न्यायदान पद्धत संपुर्णपणे पुरावे व कायद्याच्या चौकटीतून चालत असल्यामुळे जबाबदार एजन्सीकडून योग्य पुरावे व वस्तुस्थितीदर्शक पुरावे मा.न्यायालयासमोर सादर होण्यास कसूर झाल्यास सन्माननीय न्यायालयाला पुराव्याअभावी आरोपीला निर्दोष जाहीर करावे लागते; अशाच प्रकारची परिस्थिती अनेक न्यायालयीन प्रकरणात घडत असतांनाच केज शहरातील कै.यशवंतराव चाटे शिक्षण संस्थेचे सचिव शिवाजी चाटे यांच्यावर बोगस व खोट्या सह्यांचे राजीनामे दाखल करुन संस्थेचे कार्यकारी मंडळात बदल केल्याच्या आरोपावरून दि. १५ ऑक्टोबर २०२२ रोजी केज पोलीस ठाण्यात संस्थेच्या वादग्रस्त अध्यक्षा सौ. गयाबाई रामधन चाटे यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदरचा एफ.आय.आर. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांनी १० नोव्हेंबर रोजी रद्द करुन संस्था सचिव शिवजी चाटे यांना दोषमुक्त असल्याचे जाहीर केले आहे. बीड जिल्ह्य़ातील केज शहरातील कै. यशवंतराव चाटे शिक्षण संस्थेचे सचिव श्री शिवाजी चाटे यांच्यावर त्यांच्याच घरातील सावत्र चुलते श्री रामधन यशवंतराव चाटे यांच्या संस्थेच्या अध्यक्षा असलेल्या पत्नी सौ गयाबाई रामधन चाटे यानी आपल्या व कांही इतर संचालकांच्या राजीनाम्यावर खोट्या सह्या करुन,बोगस राजीनामे दाखल करुन संस्थेचे कार्यकारी मंडळ बदलल्याचा आरोप करत केज पोलिसात फिर्याद दाखल केली होती.या प्रकरणात आरोपी व फिर्यादी दोघानींही खासगीत फिगर्स प्रिंट उपलब्ध
केल्या होत्या.दोघांच्याही फिगर्स प्रिंटमध्ये संशय व संभ्रम निर्माण होण्यासारखी परिस्थिती असल्याचे स्पष्ट होते. आरोपी पक्षाकडून मात्र सदरचै प्रकरण कौटुंबिक वादविवादातून निर्माण झाल्याने केज पोलीस ठाण्यात दिनांक २५ ऑक्टोबर २०२२ रोजी खोटी फिर्याद दिल्यामुळे संस्थेचे सचिव शिवाजी चाटे यांच्यावर कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा युक्तिवाद करून मुंबई उच्च न्यायालय खंडपीठात एफ.आय.आर क्वॅश करुन घेतला असून, संस्थेचे सचिव शिवाजी चाटे यांच्या वकिलांनी मा.उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्या समोर संस्थेचे सचिव यांचे वकील अॅड.मल्हारी अदाटे व व्ही डी व्होन यांनी भाऊ-बंदकी चा मुद्दा उपस्थित करून युक्तिवाद करून संस्थेचे सचिव यांना खोट्या गुन्ह्यात अडकवले असल्याचे दाखवण्यात आले . दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून मान्यामुर्ती यांनी अखेर शिवाजी चाटे यांच्यावरील केलेला गुन्हा रद्द करण्यात आलाअसून,त्यामुळे संस्थेची व ईमानदारीने ज्ञानदानाचे काम करणार्‍या व महान समाजकार्य करणाऱ्या संस्थाचालकाची बदनामी करणाऱ्याला एक प्रकारे चांगलाच धडा देण्यात आला असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत;तसेच संस्थेचे सचिव शिवाजीराव चाटे हे निर्दोष असल्याचे मा . न्यायालयाने जाहीर केत्यामुळे शिक्षण क्षेत्रात शिवाजी चाटे यांच्या सारख्या संस्थाचालकाची प्रतिमा उजळली आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये