प्रतिनिधी/ केज: केज तालुक्यातील तांबवा येथील रवींद्र कुमार चाटे हा विधी व न्याय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात घेण्यात आलेल्या परीक्षेत दुसऱ्या श्रेणीत यशस्वी पास झाला असून, पुणे विद्यापीठाने घेतलेल्या विधी परीक्षेत त्यांने द्वितीय श्रेणी मिळवल्याबद्दल तांबवा पंचक्रोशीतील तमाम समर्थकानी त्याचे अभिनंदन केले आहे. रवींद्र कुमार चाटे हा विधी व न्याय अभ्यासक्रमासाठी नाशिक येथील पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत असलेल्या एन बी टी विधी महाविद्यालयात तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेशित झाला होता. अतिशय कष्टाळू व अभ्यासू विद्यार्थी म्हणून प्रस्तुत महाविद्यालयात त्याची गनणा झाली होती. रवींद्र कुमार चे वडील न्यायालयात हेड क्लार्क असल्यामुळे त्याचेवर विधी, न्याय,कायदा वकिलीचा चांगलाच पगडा पडलेला असल्यामुळे लहानपणापासूनच त्याला न्यायव्यवस्थेविषयी आवड निर्माण झालेली होती. संगणक शास्त्राची पदवी घेतल्यानंतर रवींद्र कुमार चाटे याने नाशिक येथील एनबीटी विधी महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला आणि तीन वर्षांच्या यशस्वी अभ्यासक्रमानंतर त्यांनी चांगल्या गुणांनी यश संपादन करून वकिलीची पदवी प्राप्त केली. आपल्या पुढील कार्यकाळात वकिलीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचा मानस रवींद्र चाटे याने पाठलाग न्यूजशी बोलताना व्यक्त केला. प्रस्तुत यशाबद्दल त्याने आपले सेवानिवृत्त वडील रामधन चाटे, आई व महाविद्यालयातील सर्व गुरुजनांच्या मार्गदर्शनाबद्दल आभार व्यक्त केले.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.