केज तालुक्यातील मस्साजोग येथील एमआरजीएसमधून करण्यात आलेली विहीरच गेली चोरीला.
कागदोपत्री लाभार्थी असलेल्या मिथुन देशमुख यांची प्रशासनाकडे धाव वरिष्ठ अधिकारी, ग्रामसेवक व रोजगार सेवकाकडून लाभार्थ्यांना कल्पनाही न देता बोगस बिले उचलल्याची दिली तक्रार.
केज:- शासनाकडून शेतकर्यांना एमआरजीएसच्या माध्यमातून विहीरी देवून शेतकर्यांची प्रगती वाढविण्याचे काम केले जाते मात्र या कामात शासनाचेच कर्मचारी बोगसगिरी करत कोट्यावधीचा माया कमविण्याचे काम केले आहे. मस्साजोगच्या मिथून देशमुख यांच्या शेतामध्ये एमआरजीएसची विहीर दाखवत ग्रामसेवक व रोजगार सेवकाकडून चक्क विहीर न खोदकाम करताच बिले उचलण्याचे काम केल्याची तक्रारी शेतकरी मिथून देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. केज तालुक्यातील मस्साजोग येथील गट नं २५/२ ब मधील ०.६१ आर एवढे क्षेत्र असलेल्या जमीनीमध्ये विहीर मंजूर करत विहीरीचे कसल्याही प्रकारचे काम न करताच पैसे उचलण्याचे काम येथील ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवकाकडून करण्यात आला आहे. मिथून देशमुख हे काही वर्षापासून आई वडील आजारी असल्याने बीड येथे राहण्यास आले आहेत. वडील गंभीर आजारी असल्याने २०२३-२४ या वर्षामध्ये गावातील शेतामध्ये जाणे अल्प झाले. या काळातच येथील ग्रामसेवक दत्तात्रय गव्हाणे, ग्रामरोजगार सेवक अमोल बळीराम बनसोडे या दोघांनी हातमिळवणी करून मिथून देशमुख यांच्या शेतात विहीर मंजूर केली. यासाठी लागणार्या मिथून देशमुखचा जीओ टॅग फोटो त्याला त्याच्या शेतातील शेजारी असलेल्या नदी खोली करणाला लागत असल्याचे सांगून बांधावर फोटो घेण्यात आला. त्यानंतर या दोघांनी शेतकरी मिथून देशमुख यांना विहीरबाबत कसलीही कल्पना न होवू देता, संपूर्ण विहीर बोगस दाखवत बिले उचलण्याचे काम केले. याबाबत मिथून देशमुख यांनी विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तर देत काही पैसे घेवून गप्प राहण्याची धमकी दिली. यानंतर मिथून देशमुख यांनी पंचायत समितीच्या तत्कालीन बिडीओ मोराळै यांची भेट घेवून सर्व प्रकार सांगितला मात्र या बोगसगिरीत यांचाही हात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शेतकरी देशमुख यांच्याकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली असून यामध्ये त्यांनी माझी विहीरच चोरीला गेली असल्याचे म्हटले आहे. यामुळे जिल्हा खळबळ उडाली आहे. & कर्मचार्यांकडून शासनाच्या निधीचा सावळा गोंधळ शासनाकडून पगार घेत शासनाची इमाने इतबारे काम करणे ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवकांचे काम असतांनाही मस्साजोग येथील ग्रामसेवक गव्हाणे व ग्रामरोजगार सेवक बनसोडे यांनी चक्क शासनाचा निधी हडप करण्याचे काम केले आहे. या बोगस कर्मचार्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.& & मजूरांचे नावे बोगस एमआरजीएस अंतर्गत करण्यात आलेल्या अनेक विहीरींच्या कामामध्ये बोगस मजूरांचे नावे दाखवत निधी हडप करण्याचे काम ग्रामसेवक व रोजगार सेवकाकडून करण्यात येत असल्याचे या घटनेतून उघडकीस आले आहे. मिथून देशमुख यांची नावाने करण्यात आलेल्या विहीरीचा संपूर्ण निधी हडपण्याचे काम रोजगार सेवक व ग्रामसेवक यांनी केले आहे.&
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.