क्राईम न्युजमहाराष्ट्र

जेवणाच्या बील बुडवण्याच्या वादातून हॉटेलच्या मॅनेजर व आचाऱ्याला मारहाण.

पाठलाग न्युज/गौतम बचुटे:

जेवणाच्या बील बुडवण्याच्या वादातून हॉटेलच्या मॅनेजर व आचाऱ्याला मारहाण.

केज :- हॉटेलच्या जेवणाच्या बीलावरून मॅनेजर सोबत भांडण करून मॅनेजर व आचाऱ्याला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली. या बाबतची माहिती अशी की, दि. २९ सप्टेंबर रोजी केज येथील अंबाजोगाईकडे जाणाऱ्या रस्त्यावर हॉटेल सुजित मध्ये रात्री ८:३० वा. च्या सुमारास बबलु केंद्रे, चौधरी दोघे (रा. अंबाजोगाई) व ईतर ६ अनोळखी हे जेवण करण्यासाठी आले होते. त्यांनी मांसाहारी जेवण झाल्या नंतर बील देण्यासाठी हॉटेलचे मॅनेजर प्रकाश भांडवलकर यांच्याकडे काऊंटर समोर आले. त्यांचे जेवणाचे बिल हे २ हजार ३०० रू. बील झाले होते. त्यावर बबलु केंद्रे हा मॅनेजर प्रकाश भांडवलकर यांना म्हणाला ऐवढे बील आम्ही देणार नाही; हे बील कमी करा. त्यावर प्रकाश भांडवलकर त्यांना म्हणाले की, हे बील कमी होत नाही सर्व फिक्स रेट आहेत. असे म्हणताच बबलु केंद्रे याने प्रकाश भांडवलकर यांना शिवीगाळ करून चापटा मारल्या. तेव्हा हॉटेलमध्ये आचाऱ्याचे काम काम करणारा रवि पुरी हा आला भांडण सोडविण्यासाठी आला असता चौधरी याने गाडीतील लोखंडी रॉडने रवि पुरी याला खाली पाडुन त्याचे उजवे पायावर मारून गंभीर दुखापत केली. तसेच हॉटेल मॅनेजर प्रकाश भांडवलकर व वेटर बिभीषन लांब यांना जीवे मारण्याची धमकी दिली. हॉटेलचे मॅनेजर प्रकाश भांडवलकर यांच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात बबलू केंद्रे, चौधरी व त्यांचे अनोळखी ६ साथीदार यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ५९०/२०२३ भा. दं. वि. १४१, १४३, १४७, १४९, ३२३, ३२६, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस जमादार श्रीकांत चौधरी हे तपास करीत आहेत.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये