Breaking Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लाचलुचपत प्रकरणी केवळ नोटा सापडल्या म्हणून आरोपी दोषी ठरू शकत नाही.पैशांची मागणी हा पुरावा महत्त्वाचा : सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश.

पाठलाग न्यूज / वृत्तसंस्था :

लाचलुचपत प्रकरणी केवळ नोटा सापडल्या म्हणून आरोपी दोषी ठरू शकत नाही.पैशांची मागणी हा पुरावा महत्त्वाचा : सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश.

न्यायवार्ता : लाचलुचपत प्रकरणात पैशांची मागणीसह रंगेहात नोटा सापडणे आवश्यक असून डिमांड म्हणजेच मागणी पंचनामा देखील महत्त्वाचा असल्याचे निर्देश माननीय सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणी निर्देश दिले असून, केवळ नोटा सापडल्या म्हणून लोक सेवकाला दोषी धरता येणार नसल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा की, केवळ लाचेची रक्कम, नोटा सापडल्या म्हणून सरकारी कर्मचाऱ्याला दोषी धरता येणार नाही. कर्मचाऱ्याने पैशांची मागणी केल्याचे सिद्ध होत नाही, तोपर्यंत दोषत्व सिद्ध होत नाही, असा महत्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान दिला. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988 अंतर्गत स्टॅम्प विक्रेतेदेखील ‘लोकसेवक’च्या व्याख्येत मोडतात. त्यामुळे भ्रष्ट वर्तनासाठी स्टॅम्प विक्रेत्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली कारवाई केली जाऊ शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत परिभाषित केलेल्या लोकसेवकाच्या व्याख्येत व्यक्ती मोडते की नाही हे ठरवताना त्या व्यक्तीने केलेल्या कामाचे स्वरूप विचारात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असेही न्यायालयाने नमूद केले. आरोपी सरकारी कर्मचाऱ्याने लाच मागितल्याचा कोणताही पुरावा नाही, किंवा प्रकरणात डिमांड पंचनामा नसेल तर, अशा परिस्थितीत केवळ सरकारी कर्मचाऱ्याकडून नोटा ताब्यात घेणे हे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7 आणि 13(1) (ड) अंतर्गत गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरेसे नाही, असे निरीक्षण न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने निर्णय देताना नोंदवले.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये