जातीवाचक शिवीगाळ करत बेदम मारहाण ; रामवडगाव पोलीस ठाण्यात आठ जणाविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल !
केज : दारू पिऊन जातीवाचक शिवीगाळ करून कुटुंबातील लोकांना काठी आणि दगडाने मारहाण करत जातिवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी आठ जणांच्या विरुद्ध हाणमार व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या बाबत केज पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार दि.१५ जुलै रोजी केज तालुक्यातील कळंबअंबा येथील गणेश शिवाजी मस्के व त्यांचे चुलते उत्तम मस्के हे त्यांच्या घरा समोर बसलेले असताना त्यांच्या शेजारी शेत असलेला बंकटी हरीभाऊ तारुकर हा दारु पिऊन त्यांच्याकडे आला व त्याने विनाकारण दोघांना जातीवाचक शिविगाळ करु लागला. भांडणाचा आवाज ऐकुन गणेश मस्के याचे वडिल शिवाजी मस्के, आई मैनाबाई मस्के व पत्नी रंजना मस्के, चुलती कांचना मस्के, चुलती लक्ष्मी मस्के असे घराचे बाहेर आले. त्यानी बंकटी तारुकर यास आमचे लोकांना शिविगाळ का करता. असे विचारताच बंकटी तारुकर याने गणेश मस्के यांचे चुलते उत्तम रंगनाथ मस्के यांना डोक्यात दगड मारुन दुखापत केली. नंतर बंकटी तारुकर यांने फोन करुन त्याचे वडिल हरीभाऊ काकासाहेब तारूकर व नातेवाईकांना फोन करुन बोलावुन घेतले. त्या पैकी हरीभाऊ काकासाहेब तारुकर याने गणेश मस्के यांचे वडिल शिवाजी रंगनाथ मस्के यांच्या पाठीमध्ये काठीने मारहाण करुन मुक्कामार दिला. तर त्यांच्या सोबतच्या नातेवाईकांनी काठी आणि दगडाने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.गणेश मस्के यांच्या तक्रारी वरून बंकटी हरिभाऊ तारुकर, हरीभाऊ काकासाहेब तारुकर, गणेश रामभाऊ तारुकर, रंधावणी रामभाऊ तारुकर, शालुबाई, सिताबाई हरिभाऊ तारुकर, दिपा बंकटी तारुकर आणि रामभाऊ दगडुबा तारुकर सर्व (रा. कळंबअंबा ता. केज ) या आठ जनांच्या विरुद्ध युसूफवडगाव पोलीस ठाण्यात गु.र.न. १६८/२०२४ ॲट्रॉसिटी कलम ३(१) (आर), ३(१) (एस), ३(२) (व्हीए) यासह भा.न्या. सं. ११५(२), ११८(१), १८९(२), १९०, २९१(२) ९११(३), ३५१(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी सहाय्यक पोलिस अधीक्षक कमलेश मीना हे तपास करीत आहेत.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.