डॉ. संदीप सांगळे एमपीएससीच्या आरोग्य उपसंचालक परिक्षेत राज्यात प्रथम.लवकरंच आरोग्य उपसंचालक पदावर नियुक्ती!पाठलाग न्युज नेटवर्क:नगर जिल्हयात कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये ग्रामीण भागात राज्यात अव्वल दर्जाची आरोग्य सेवा देणारे डॉ.संदीप सांगळे हे आता आरोग्य उपसंचालक पदाची लेख व तोंडी परिक्षेत (MPSC) राज्यात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. त्याच्या या यशा बद्दल जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे. डॉ. सांगळे यांनी आपले प्राथमिक शिक्षण अतिशय प्रतिकुल परिस्थिती सुतारवाडी येथील जिल्हा परिषद शाळा (पारनेर) येथे, तर माध्यमिक शिक्षण ढवळपुरी (पारनेर) या दुर्गम भागात पुर्ण केले होते. त्यानंतर नगर कॉलेजमध्ये 11 वी, 12 वी विशेष प्राविण्यास पुर्ण केल्यावर त्यांनी पुण्याच्या बीजे मेडिकलमधून एमबीएसची पदावी मिळवली. यातही डॉ. सांगळे पुणे विद्यापीठात प्रथम होते. 2009 मध्ये डॉ. सांगळे यांनी (MPSC) मधून वैदयकीय अधिकारी वर्ग 2 या पदावर शासकीय आरोग्य अधिकारी म्हणून कामाला सुरुवात केली. 2011 मध्ये पुन्हा एमपीएससी मधून जिल्हा आरोग्य अधिकारीपदावर त्यांची निवड झाली. डॉ. सांगळे यांनी अहमदनगर व नंदुरबार जिल्हयात अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर काम केलेले आहे. तर बीड आणि अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून उत्कृष्ठ काम केलेले आहे. नगर जिल्हयातील कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत त्यांनी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग यात दूवा म्हणून यशस्वी काम केले. त्यांच्यासह झेडपी आरोग्य विभागाच्या टीमने कोविड काळात अनेकांना जिवदान दिल. डॉ. सांगळे यांनी यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये उल्लेखनीय काम केलेले आहे. आता ते आरोग्य उपसंचालकपदाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांचे राज्याचे मुख्य सचिव यांचे सचिव तथा मुंबईचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर, नगर झेडपी सीईओ आशिष येरेकर यांनी कौतुक केले आहे. लवकर त्यांना आरोग्य उपसंचालक पदावर पोस्टींग मिळणार आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.