ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

माझ्या कार्यकाळातील केज मतदार संघाचा विकास हेच माझे व्हिजन —–संगिता ठोंबरे भाजपाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांना मिळत आहे सर्व जाती-धर्मांच्या मतदारांचा पाठिंबा.

पाठलाग न्यूज / निवडणूक प्रतिनिधी :

माझ्या कार्यकाळातील केज मतदार संघाचा विकास हेच माझे व्हिजन —–संगिता ठोंबरे

भाजपाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांना मिळत आहे सर्व जाती-धर्मांच्या मतदारांचा पाठिंबा.

केज /प्रतीनिधी: राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत असतानाच केज विधानसभा या राखीव मतदार संघात मात्र मोठ्या वादळाने वेग घेतला असून, महायुती, महविकासआघडी चे उमेदवार आप-आपल्या ताकतीने आपले नशीब अजमावत आहेत. माञ केज मधे माजी आमदार संगीताताई ठोंबरे यांच्यावर मतदारांनी विश्वास दाखवल्याने सध्या तरी मतदार संघात त्यांच्या नावाची जोरदार चर्चा ऐकवयास मिळत आहे. सध्या निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. महायुती, महविकास आघाडी सह अन्य पक्षांनी आपले आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यात केज विधानसभा मतदार संघात माजी आमदार संगीताताई विजयप्रकाश ठोंबरे यांनी 2014 ते 2019 या काळात केलेल्या विकास कामांच्या जोरावर आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी केज विधानसभा मतदार संघातील नेकनूर पासून ते आंबेजोगाई पर्यंत विविध विकासकामे केलेली आहेत,त्यात नेकनूर येथील एसटी महामंडळाचे बस स्टॅन्ड, केज येथील महामंडळाचे बस स्टँड तसेच पंचायत समितीची  इमारत, कोर्टाची इमारत, केज येथील पोलीस स्टेशनची इमारत, त्याच प्रमाणे केज मध्ये संत भगवान बाबा यांच्या नावाने सभागृह, आंबेजोगाई येथील एसटी महामंडळाची भव्य दिव्य अशी इमारत सह अन्य कामे त्यांनी केले आहेत.या विविध विकास कामांच्या जोरावर त्यांनी आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून विधानसभा मतदारसंघातून त्यांच्याकडे लोकांची स्वयंस्फूर्तपणे भेटण्यासाठी गर्दी होताना दिसून येत आहे. पाठलागच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी बातचीत केली असता, त्यांनी मी केलेली विकास कामे हेच माझे निवडणुकीतील व्हिजन असून, यावरच मला मतदार निवडून देणार आहे आणि आज मी कोणत्याही पक्षाची उमेदवार नसून जनता हाच माझा पक्ष असल्याचे त्यांनी पाठलाग शी बोलताना सांगितले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभीआहे, त्यामुळे मी हजार टक्के निवडून येणार असा मला ठाम विश्वास आहे.मतदारसंघात मी अनेक विकासकामे केली आहेत.प्रत्येक जाती धर्मातील लोकांना मी कधी पण परक्याची वागणूक दिली नाही मी कधी कोणाचे कामे अडवले नाहीत मी प्रत्येक गावात प्रत्येक समाजाला काही ना काही आणि ती दिलेला आहे एखाद्या गावात मी काही दिले नसले तरी सध्याच्या लोकप्रतिनिधींसारखे सर्वसामान्यांची कामे तरी अडवली नाहीत असे त्या बोलत होत्या येणाऱ्या काळात मांजरा धरणात तीन टीएमसी पाणी आणण्यासाठी आणि मतदारसंघ सुजलाम सुफलाम होण्यासाठी मला जिंकून यायचे आहे. असेही त्या बोलत होत्या.त्यामुळे त्यांना सध्या तरी मतदारांचा कौल असल्याचे दिसून येत आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये