Breaking Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

केज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा कायदेशीर – बेकायदेशीर वापर : आवाजाची मर्यादा ओलांडल्याने नागरिक त्रस्त असल्याच्या तक्रारी : — पोलीस निरीक्षक उनवणे.

पाठलाग न्यूज / प्रतिनिधी :

केज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा कायदेशीर – बेकायदेशीर वापर : आवाजाची मर्यादा ओलांडल्याने नागरिक त्रस्त असल्याच्या तक्रारी : — पोलीस निरीक्षक उनवणे.

प्रतिनिधी/ केज: केज शहर व परिसरातील धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेल्या भोंग्यांच्या वापराबाबत नागरिकांमध्ये असंतोष वाढताना दिसत असून, सर्वोच्च न्यायालय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांनुसार, धार्मिक स्थळांवरील भोंगे सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंतच वापरता येतात. तसेच त्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाकडून परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे मत केज पोलीस ठाण्याचे प्रमुख पोलीस निरीक्षक श्री उनवणे यांनी एका स्थानिक बैठकीतून व्यक्त केले.

बैठकीतून मार्गदर्शन करताना उनवणे यांनी सांगितले की, परवानगी घेतलेल्या लाऊड स्पीकर व भोंग्यांना आवाजाची कायदेशीर मर्यादा घालून देण्यात आलेली आहे. तशा आवाजाचे नियमानुसार खालील प्रमाणे पालन करणे गरजेचे आहे. निवासी भागात : ५५ डेसिबल (दिवस), ४५ डेसिबल (रात्र), शांत क्षेत्र (शाळा, रुग्णालय परिसर) : ५० डेसिबल (दिवस), ४० डेसिबल (रात्र) ही मार्गदर्शक तत्वे कायद्यान्वये असताना सुद्धा,मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी भोंगे या मर्यादेपेक्षा दुप्पट आवाजात वाजवले जात असून, यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास, रुग्णांची झोप व नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे नियमांचे काटेकोरपणे पालन करावे अशी विनंती त्यांनी केली.पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, धार्मिक स्थळांवर भोंगे बसविण्यापूर्वी लेखी अर्ज करून परवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगीशिवाय बसवलेले किंवा ठरवलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ व ठरलेल्या डेसिबल मर्यादेपेक्षा जास्त आवाजात वाजवलेले भोंगे हे बेकायदेशीर ठरतात. यावर कारवाई करण्याचे अधिकार स्थानिक पोलिसांना आहेत. आशा ही सूचना उनवणे यांनी बैठकीतून केल्या. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरण प्रेमींनी प्रशासनाला मागणी केली आहे की, परवानगीशिवाय लावलेले व आवाज मर्यादा ओलांडणारे भोंगे तातडीने काढून टाकावेत. नागरिकांच्या शांततेचा व आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन प्रशासनाने ठोस पावले उचलणे आवश्यक असल्याचे मत अनेकांनी बोलून दाखवले असल्याची माहिती , केज पोलीस ठाण्याचे प्रभारी श्री उनवणे यांनी बैठकीत दिली आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये