शाखाअभियंता व्ही. डी. बनसोडे पाटबंधारे खात्यातून सेवानिवृत्त.
केज : – केज तालुक्यातील कानडी माळी येथील रहिवासी असलेले विठ्ठल बनसोडे हे मागच्या काही वर्षांपासून पुणे येथील सिंचन भवन येथे शाखा अभियंता म्हणून कार्यरत होते. विठ्ठल दामोदर बनसोडे हे नियत वयोमानानुसार आज 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले असून, कार्यालयाच्या वतीने त्यांचा हृदय सत्कार करून निरोप देण्यात आला. विठ्ठल दामोदर बनसोडे हे मागच्या ३८ वर्षांपूर्वी पाटबंधारे खात्यात रुजू झाले होते. अनेक वर्षे केज, अंबाजोगाई आणि फलटण येथे सेवा केल्यानंतर त्यांची बदली पुणे येथील सिंचन विभागात झाली होती. पुणे येथे त्यांच्याकडे खडकवासला पाटबंधारे मालमत्ता विभागाची जबाबदारी होती. तिथेही अगदी चोखपणे आपले कर्तव्य बजावल्यानंतर दि. ३१ मे रोजी ते सेवानिवृत्त झाले. दरम्यान सिंचन भवन कार्यालयात त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांचा हृदय सत्कार करून सेवेतून निरोप देण्यात आला. या प्रसंगी खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांच्यासह सर्व कर्मचारी वर्गाची उपस्थिती होती.”
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.