क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बीड जिल्ह्यात फोफावलेल्या गुन्हेगारीवर पोलीस अधीक्षकांची करडी नजर. एका झपक्यात एक पोलीस उप निरीक्षक व दोन पोलीस कर्मचारी निलंबित.

पाठलाग न्यूज / क्राईम प्रतिनिधी :

बीड जिल्ह्यात फोफावलेल्या गुन्हेगारीवर पोलीस अधीक्षकांची करडी नजर.

एका झपक्यात एक पोलीस उप निरीक्षक व दोन पोलीस कर्मचारी निलंबित.

बीड: मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातल्या सर्वच क्षेत्रातली दबलेली गुन्हेगारी उघड होत असतानाच गुन्हेगारीला नजरेआड करणारे आणि गुन्हेगारींचे आरोप असणाऱ्या संबंधितावर बिनधास्त धडाधड कारवाया चालू असल्याचे समोर असताना देखील  बीड सायबर विभागातील एका पोलीस उपनिरीक्षकाने एका प्रकरणात पैशाची तडजोड केल्याचे उघड झाल्यामुळे तसेच जिल्ह्यातल्या गाजत असलेल्या आरोपी खोक्या भोसलेला बंदोबस्तातील दोघा पोलीस कर्मचाऱ्यांनी व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचे समोर आल्याने संबंधित सायबर प्रकरणातील पोलीस उपनिरीक्षक व खोक्या भोसले ची बडदास्त करणार्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी तडकाफडकी निलंबित केल्याने पोलीस खात्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, बीडच्या नियंत्रण कक्षातून सायबर विभागात बदली झालेले पोलीस उपनिरीक्षक रंजीत कासले यांनी एका महत्त्वाच्या प्रकरणात चौकशीच्या मुद्द्याखाली पैशाची देवाण-घेवाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आणि सदरचा व्हिडिओ हा थेट राज्याचे कायदा आणि सुव्यवस्था प्रमुख अधिकाऱ्यांकडे गेला असल्याने याची चौकशी होऊन पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले हे दोषी ठरल्यामुळे त्यांना बीडचे पोलीस अधीक्षक कावत यांनी तडकाफडकी सेवेतून निलंबित केले आहे. तर बीड जिल्ह्याच्या राजकारणात गुन्हेगारी ठोपवली असतानाच आष्टी पाटोद्याचे आमदार सुरेश धस यांचा समर्थक खोक्या भोसले याला नुकतीच न्यायालयीन कोठे मिळाल्यानंतर चकलांबा पोलीस ठाण्याचे कर्मचारी कैलास खाटाने आणि विनोद सुरवसे यांनी कारागृहाच्या बाहेर खोक्या भोसलेची चांगलीच बडदास केली त्याला मोकळे सोडून एखाद्या नेत्याप्रमाणे मोकार वर्तन करू दिले तसेच त्याला बिर्याणीच्या भोजनाचा बेत संपन्न करून दिला. सदरच्या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होताच बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी तातडीने चौकशी करून चकलांबा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देत प्रस्तुत दोन्ही कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित केले आहे. दरम्यान सदरच्या कार्यवाहीमुळे बीड जिल्ह्यातील तमाम जनतेने बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचे अभिनंदन केले आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये