मास कॉपी प्रकरणी विभागातील नऊ महाविद्यालयांच्या प्रचारांना प्रत्येकी पन्नास हजाराचा दंड. बीड जिल्ह्यातील तीन महाविद्यालयांचा समावेश.
छत्रपती संभाजीनगर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीअभ्यासक्रमांच्या परीक्षेत अनेक ठिकाणी सामुहिक कॉपीचे प्रकार समोर आले आहेत. अशा नऊ महाविद्यालयांच्या प्राचार्यांना विद्यापीठ प्रशासनाने प्रत्येकी ५० हजारांचा दंड आकारला आहे. परीक्षा व मुल्यमापन मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने संबंधित प्राचार्यांना नोटीसाही जारी करण्यात आल्या आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातील तीन महाविद्यालयांचा समावेश आहे. छ. संभाजीनगर : काही दिवसांपासून विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने प्रयत्नशील आहे. परंतू, कॉपीमुक्ती अभियानच्या या प्रयत्नाला काही महाविद्यालयांनी खो दिला आहे. कुलगुरू डॉ. विजय फुलारी आणि परीक्षा संचालक डॉ. बाबासाहेब डोळे यांनी काही महाविद्यालयांना परीक्षेदरम्यान प्रत्यक्ष भेटी दिल्या. त्यात सामुहिक कॉपीचे प्रकार आढळून आले. यासोबत अनेक महाविद्यालयात प्राचार्य आणि सहकेंद्र प्रमुख हजर नसल्याचे निदर्शनास आले. जेथे जेथे कॉप्या आढळून आल्या आहेत. त्या परीक्षा केंद्रावर कारवाईचे आदेश कुलगुरू डॉ. फुलारी यांनी परीक्षा व मुल्यमापन मंडळास दिले आहेत. त्यानुसार आता परीक्षा मंडळाने दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला आहे.
@पर्यवेक्षक, सहकेंद्र प्रमुखांनाही दंड@
परीक्षा व मुल्यमापन मंडळाच्या बैठकीत दंडात्मक कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे. कॉपी आढळलेल्या महाविद्यालयांना प्रत्येकी ५० हजार रुपये तसेच ज्या परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक व सहकेंद्र प्रमुख रुजू झालेले नाहीत, अशा पर्यवेक्षक, सहकेंद्र प्रमुखांना प्रत्येक १० हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. @पर्यवेक्षक, सहकेंद्र प्रमुखांनाही दंड.@
परीक्षा व मुल्यमापन मंडळाच्या बैठकीत दंडात्मक कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे. कॉपी आढळलेल्या महाविद्यालयांना प्रत्येकी ५० हजार रुपये तसेच ज्या परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक व सहकेंद्र प्रमुख रुजू झालेले नाहीत, अशा पर्यवेक्षक, सहकेंद्र प्रमुखांना प्रत्येक १० हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. &महाविद्यालयांच्या प्राचार्यांना दंड करण्यात आलेल्या महाविद्यालयांची यादी.& छत्रपती संभाजीनगर शहरातील सर सय्यद महाविद्यालय, वसंतराव नाईक महाविद्यालय, पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालय, राजकुंवर महाविद्यालय, फर्दापूर, बीड जिल्ह्यातील बलभीम महाविद्यालय, आदित्य एम. बी. ए. महाविद्यालय, के. एस. के. महाविद्यालय आणि जालना जिल्ह्यातील हिवराळा येथील राजकुंवर महाविद्यालयांच्या प्राचार्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.