दारू उधार का देत नाहीस ? म्हणून बार मालकाला तलवारीने मारहाण करून ३५ हजाराचा ऐवज लांबविला.
केज :- एका बिअर बारच्या मालकाला उधार दारू का देत नाहीस ? असे म्हणत एका बेवड्याने तलवारीने मारहाण करून बार मालकाची रोख रक्कम व सोन्याची चैन पळवून नेली. या बाबतची माहिती अशी की, दि. ३० सप्टेंबर रोजी दुपारी ४:०० नांदूरघाट येथे शिरूर रोडवरील अंकुश मोराळे यांच्या मालकीच्या बिअर बारमध्ये विठ्ठल विश्वनाथ जाधव आला. त्याने अंकुश मोराळे यास दारू उधार मागीतली. तेव्हा त्याला ऊधार दारू दिली नाही. दारू उधार का दिली नाही म्हणून विश्वनाथ जाधव याने शर्टाचे आतमध्ये पाटीवर लपवून ठेवलेली धारदार तलवार काढुन अंकुश मोराळे यांच्या उजव्या डोळ्याच्या बाजूला मारून दुखापत केली. तेव्हा हॉटेल मधिल वेटर विष्णु आश्रुबा मोराळे हा धावत आला. तेवढ्यात विठ्ठल जाधव याने हॉटेलच्या गल्ल्यातील नगदी १० हजार रूपये व गळ्यातील सोन्याची ३ तोळ्याची २५ हजार रु. ची चैन काढून घेत स्कुटी वर बसून निघून गेला. या प्रकरणी अंकुश झुंबर मोराळे यांच्या फिर्यादी वरून विठ्ठल जाधव यांच्या विरुद्ध गु र नं ५९३/२०२३ भा दं वि ३२४, ३२७ आणि तलवारीने वार केला म्हणून शस्त्र अधिनियम २५ व ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दूरस्थ नांदूरघाट पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जसवंत शेप हे तपास करीत आहेत.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.