केजच्या राजकीय व शिक्षण क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व नारायण बप्पा घुले यांचे अपघाती निधन.
केज :– तालुक्यातील राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील एक नामांकित व्यक्तिमत्व तथा केज पंचायत समितीचे माजी उपसभापती नारायणराव घुले उर्फ (बप्पा ) यांचे आज दुपारी 4 च्या दरम्यान बाईक वरून रस्ता पास करताना अपघाती निधन झाले आहे. त्यांच्या या अचानक व अपघाती इक्झिट मुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. केज तालुक्यातील टाकळी येथील रहिवासी आणि दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांचे खंदे समर्थक नारायण कुंडलिक घुले बप्पा हे राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील एक नावाजलेले परिचित व्यक्तिमत्व होते. मागच्या काही काळात ते केज पंचायत समितीचे उपसभापती तर टाकळी गावचे सरपंच म्हणूनही राहिलेले आहेत.शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातूनही ते शिक्षण क्षेत्रात अग्रेसर होते.श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून त्यांनी टाकळी येथे उत्कृष्ट प्रकार आश्रम शाळा स्थापन केलेली आहे. मंगळवारी सायंकाळी (दि.3 जून) बप्पा बीड रोडवर बीएसएनएल टावर नजीक असलेल्या त्यांच्या निवास्थानी जात असताना बीड कडून भरघाव वेगात परळी कडे जाणाऱ्या एका चार चाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदरील अपघात केज शहरातील बीड रोडवरील शिक्षक कॉलनी ते बीएसएनएल ऑफिस दरम्यान मधुबन हाटेल समोर झाला आहे. त्यांच्या पार्थिवावर उध्या सकाळी दि. 4/5/2025 रोजी टाकळी गावी अंत्यसंस्कार केले जातील. पाठलाग परिवाराकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.